Jio | जिओचा जबरदस्त प्लॅन, लिमीट संपल्यानंतरही इंटरनेट वापरता येणार

रिलायन्स जिओने (Reliance Jio) टेलिकॉम क्षेत्रात (Telecom Sector) नवी क्रांती केली.

Updated: Feb 9, 2022, 05:52 PM IST
Jio | जिओचा जबरदस्त प्लॅन, लिमीट संपल्यानंतरही इंटरनेट वापरता येणार title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई :  रिलायन्स जिओने (Reliance Jio) टेलिकॉम क्षेत्रात (Telecom Sector) नवी क्रांती केली. जिओने मार्केटमध्ये कमी पैशात जास्तीत सेवा देण्याचा पायंडा पाडला. जिओच्या असंख्य असे प्लान्स आहेत, ज्यामध्ये जास्त डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग (Reliance Jio Recharge Plans) अशा सेवांचा समावेश आहे.  जिओच्या परवडणाऱ्या प्लॅन्सपैकी आम्ही तुम्हाला असाच एक स्वस्तात मस्त आणि खिशाला परवडणारा प्लॅनबाबत माहिती देणार आहोत. तुम्ही जर सर्वोत्तम एका महिन्याच्या रिचार्जच्या शोधात असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठीच आहे असचं समजा. (reliance jio 28 days plan with 1 gb daily internet data 100 sms per day know information for 186 ruppees plan)  
  
जिओचा 186 रुपयांचा अफलातून प्लॅन

jio Phone च्या 186 रुपयांच्या प्लॅनची वॅलिडिटी ही 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजरला दिवसाला  1 जीबी डेटा मिळतो. थोडक्यात सांगायचं झालं तर एकूण 28 जीबी डेटा. विशेष म्हणजे 1 जीबी डेटा संपल्यानंतरही @64kbps या स्पीडने डेटा मिळतो. याचाच अर्थ डेली लिमीट संपल्यानंतरही तुम्ही इंटरनेट वापरु शकता.  

फ्री कॉलिंग आणि दररोज 100 SMS 

इंटरनेट डेटाव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा समावेश आहे. यूजर्स कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग करु शकतो. कॉलिंगसोबत यूजरला दिवसाला 100 SMS मिळतात. तसेच या प्लॅनमध्ये जिओ मूवी, जिओ सिक्योरिटी, जिओ क्लाऊड याचं फ्री सब्सक्रिप्शन दिलं जातं. त्यामुळे हा प्लॅन स्वस्तात मस्तच आहे.