Poco C55 स्मार्टफोन लाँच! पहिल्याच दिवशी खरेदीवर 'इतकी' मोठी सूट

POCO C55 Price in India: पोकोने त्यांच्या C सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन लॉंच केला आहे. या स्मार्टफोनचे नाव POCO C55 आहे. या स्मार्टफोनच्या पहिल्या दिवशी खरेदीवर 1500 रूपयांची भरघोस सुट देण्यात आली आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. 

Updated: Feb 21, 2023, 02:13 PM IST
 Poco C55 स्मार्टफोन लाँच! पहिल्याच दिवशी खरेदीवर 'इतकी' मोठी सूट title=

POCO C55 Price in India: पोकोने त्यांच्या C सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन लॉंच केला आहे. या स्मार्टफोनचे नाव POCO C55 आहे. या स्मार्टफोनच्या पहिल्या दिवशी खरेदीवर 1500 रूपयांची भरघोस सुट देण्यात आली आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे वाट कसली पाहताय आताच स्मार्टफोन खरेदी करा. 

POCO ने त्याच्या C-Series पोर्टफोलिओसह 10k वर्षांखालील विभागात जबरदस्त यश मिळवले आहे.खऱ्या गेम चेंजर ठरणाऱ्या सर्वोत्कृष्ट आणि सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनसह बजेट सेगमेंटची पातळी वाढवण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे स्मार्टफोन लॉंचिंग दरम्यान  POCO इंडियाचे प्रमुख हिमांशू टंडन यांनी सांगितले आहे. POCO C55 मध्ये असे अनेक फीचर्स आहेत जे एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये स्मार्टफोनचा अनुभव उंचावतील, असे कंपनीचे म्हणणे आहे.  

फिचर्स 

  • POCO C55 मध्ये  MediaTek Helio G85 चिपसेट आहे. MediaTek Helio G85 Arm Mali-G52 GPU ला 1GHz शिखरापर्यंत पंप करते, जे उत्साही मोबाईल गेमर्ससाठी शाश्वत कामगिरी देते.
  • POCO C55 4GB + 64GB आणि 6GB + 128GB मध्ये उपलब्ध आहे. 
  • तसेच  स्मार्टफोनमध्ये 5GB टर्बो रॅम वाढवू शकता. आणि 11GB वाढवण्याचीही क्षमता आहे. 
  • हा  स्मार्टफोन Android 12 वर चालतो त्याचा AnTuTu स्कोअर 260K पेक्षा जास्त आहे.
  • POCO C55 मध्ये 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, सेल्फीसाठी यात 5MP फ्रंट स्नॅपर आहे.
  • स्मार्टफोन 1080p @ 30fps आणि 720p @ 30fps च्या व्हिडिओ रेकॉर्डिंगला देखील सपोर्ट करतो.
  • POCO C55 मध्ये 5000mAh बॅटरी आहे आणि ती 10W चार्जिंगला सपोर्ट करते.
  • POCO C55 फॉरेस्ट ग्रीन, कूल ब्लू आणि पॉवर ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

स्मार्टफोनची किंमत किती? 

POCO C55 च्या 4GB + 64GB ची किंमत 9 हजार 499 आहे, तर 6GB + 128GB ची किंमत 10,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन 28 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.  

ऑफर काय? 

POCO ने 4GB + 64GB व्हेरियंटवर पहिल्या दिवशी 500 रुपयांची सवलत दिली आहे. तसेच,  SBI, HDFC आणि ICICI डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी अनुक्रमे 4GB + 64GB आणि 6GB + 128GB व्हेरिएंटवर 500 आणि 1,000 च्या बँक ऑफर जाहीर केल्या आहेत. यामुळे पहिल्या दिवसाची किंमत 8,499 रुपये आणि 9,999 रुपयांपर्यंत खाली येणार आहे. 

दरम्यान या ऑफरनंतर ग्राहकांना आणखीण कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर स्मार्टफोन घेण्यास इच्छुक असाल, तर हा स्मार्टफोन नक्की खरेदी करा.