Duplicate Driving License : रस्त्यावर वाहन चालवयाचे असेल तर वाहन चालवण्याचा परवाना (Driving License) हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहने चालवली तर तुमचे चलन कधीही कापले जाऊ शकते. याशिवाय अपघात झाल्यास तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. त्यामुळे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Online Driving License) असणे आवश्यक आहे.
परंतु अनेक वेळा असे दिसून येते की वाहन चालकाचे Driving License कुठेतरी हरवले जाते किंवा ते चोरीला जाते. अशा परिस्थितीत काळजी करण्याऐवजी तुम्ही Duplicate Driving License साठी अर्ज करावा. त्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया पुर्ण करा.
- ड्रायव्हिंग लायसन्सला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला परिवहन विभागाच्या या https://parivahan.gov.in/ वेबसाइटवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर ऑनलाइन सर्व्हिसवर क्लिक केल्यानंतर होम पेजवर ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवांवर जावे लागेल.
- यानंतर तुमच्या समोर एक वेगळे पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव निवडायचे आहे.
- राज्य निवडल्यानंतर, तुमच्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल. यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. जिथे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, अर्ज सबमिट करण्याचा पर्याय येईल.
- याआधी तुम्हाला संपूर्ण अर्ज भरावा लागेल. ज्यामध्ये तुम्हाला जे काही तपशील विचारले जातात ते भरा.
- नंतर अपलोड करण्यासाठी जे काही दस्तऐवज विचारले जातात ते तुम्ही अपलोड करा.
- ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला फोटो अपलोड करावा लागेल आणि सही अपलोड करावी लागेल.
- यानंतर फी जमा करण्याचा पर्याय येईल. ज्यामध्ये तुम्हाला शुल्क जमा करावे लागेल.
- या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, पावती डाउनलोड करा आणि प्रिंट करा.