कोणालाही खरेदी करता येईल OnePlus चा हा ढासू फोन; दमदार बॅटरी आणि फिचर्स पाहून घ्याच

Tech News : चांगला कॅमेरा, चांगले फिचर्स आणि दमदार बॅटरी असणाऱ्या स्मार्टफोनच्या शोधात तुम्हीही आहात का? 

सायली पाटील | Updated: Jan 30, 2024, 02:39 PM IST
कोणालाही खरेदी करता येईल OnePlus चा हा ढासू फोन; दमदार बॅटरी आणि फिचर्स पाहून घ्याच  title=
OnePlus Nord N30 SE 5G tech news in marathi

Tech News : एखादा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात तुम्हीही आहात का? तुमचं उत्तर जर हो असेल, तर तुमच्यासाठी एक कमाल पर्याय तयार आहे. जिथं तुमचे फार पैसेही खर्च होणार नाहीत आणि किमान खर्चात तुम्हाला चांगल्या फिचर्ससह एचडी फोटो टीपणाऱ्या कॅमेराचा फोनही खरेदी करता येणार आहे. हा कोणता आयफोन, गुगल पिक्सल किंवा सॅमसंगचा फोन नसून, हा आहे अनेकांच्याच आवडत्या वनप्लस या ब्रँडचा फोन. 

नुकताच वनप्लसनं त्यांचा वनप्लस नॉर्ड एन30 एसई 5जी हा फोन लाँच केला आहे. युएईमध्ये लाँच करण्यात आलेल्या या फोनची किंमत 13,560 रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. उत्तम क्वालिटीचा डिस्प्ले, नव्या अँड्रॉईड 13 ऑपरेटींग सिस्टीमची जोड, 5000 mAh बॅटरी या फोनच्या युजर्सना कमाल अनुभव देणार आहेत. काळ्या आणि निळ्या रंगांमध्ये या फोनचे व्हेरिएंट उपलब्ध असून,  अद्याप जगातील इतर ठिकाणी हा फोन नेमका कधी लाँच होणार आहे याबाबत मात्र कोणतीही माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. 

OnePlus Nord N30 SE 5G specifications / काय आहेत फोनचे फिचर्स? 

नप्लस नॉर्ड एन30 एसई 5जी हा एक 6.72 इंचांचा फुल एचडी+ डिस्प्ले असणारा स्मार्टफोन आहे. त्याचं पिक्सेल रिजॉल्यूशन 1080x2400 इतकं असून, तो ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंशन 6020 चिपसेटवर काम करतो. जो 4 जीबी रॅमनं जोडण्यात आला आहे. 128GB चा स्टोरेज असणारा हा फोन मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येऊ शकतो. अँड्रॉईड 13 ऑपरेटींग सिस्टीमवर चालणाऱ्या या फोनमध्ये कंपनीनं OxygenOS 13.1 सुद्धा जोडलं आहे. 

राहिला मुद्दा कॅमेराचा, तर या फोनचा एक कॅमेरा 50 मेगापिक्सल असून, तो दिवसा कमाल फोटो टीपतो. तर, दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सला असून, फोटो आणखी उठावदार करण्यास मदत करतो. या फोनचा फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल असून, सेल्फीप्रेमींसाठी तो परवणीच ठरतो. 

हेसुद्धा पाहा : अविवाहित अभिनेत्री झाली आई; वयाच्या 31 व्या वर्षी अखेर मिळाली प्रेमाच्या माणसाची साथ 

वनप्लसकडून या व्हेरिएंटमध्ये आणखीही काही कमाल फिचर्स देण्यात आले आहेत. जिथं एका बाजूला फिंगरप्रिंट सेंसर असून, त्याच्या मदतीनं तुम्ही फोन व्यवस्थित अनलॉक करू शकता.  5000 mAh च्या बॅटरीमुळं हा फोन बराच वेळ चालतो आणि 33W फास्ट चार्गिंगमुळं पटापट चार्जही होतो. आवाजाच्या बाबतीतही हा फोन मागे नाही. यामध्ये असणआरे स्टीरियो स्पीकर्स तुमच्या गरजा भागवतात. असा हा फोन आता भारतात लाँच झाल्यावर त्याची किंमत नेमकी किती असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.