आता गूगल होम स्पीकरवरुन करा फ्री कॉल

तुमच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण, आता तुम्ही गूगल होम स्पीकरच्या माध्यमातून फ्रीमध्ये कॉल करु शकणार आहात. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 19, 2017, 09:45 PM IST
आता गूगल होम स्पीकरवरुन करा फ्री कॉल title=

नवी दिल्ली : तुमच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण, आता तुम्ही गूगल होम स्पीकरच्या माध्यमातून फ्रीमध्ये कॉल करु शकणार आहात. 

यूजर्सला फ्री कॉल करता यावा यासाठी कंपनीने नवं फीचर्स लाँच केलं आहे. याची सुरुवात गुरुवार पासून होणार आहे. फ्री कॉल करण्यासाठी तुम्हाला नंबरही डाईल करण्याची गरज लागणार नाहीये. केवळ गूगल स्पीकरला वॉईस कमांड द्यावी लागणार आहे. त्यानंतर कॉल आपोआप कनेक्ट होईल. 

पण, यासाठी तुम्हाला गूगल होमला कॉन्टॅक्ट नंबरचा अॅक्सेस द्यावा लागेल. गूगलने एक वर्षापूर्वीच आपला स्मार्ट स्पिकर बाजारात लाँच केला होता. यामध्ये गूगलने असिस्टंट वायर कंट्रोल दिलं आहे. 

गूगल होम ४७७ ग्रॅम (१४३x९६) वजनाचं आहे. तर अॅमेझॉनच्या इकोचं वजन १.०५ किलो आहे. गूगल स्पीकर अॅमेझॉनपेक्षा लहान आहे. गूगलने दिलेल्या माहितीनुसार, एका आठवड्यानंतर यूजर्स या फीचरचा लाभ घेऊ शकतील. 

मात्र, हे फीचर अद्याप भारतासाठी नाहीये. सध्या अमेरिका आणि कॅनडातील यूजर्सच गूगल होम स्पीकरच्या माध्यमातून फ्री कॉल्सच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.