Motorola Edge 40 Pro Smartphone Feature: स्मार्टफोन युजर्सची गरज पाहता कंपन्या एकापेक्षा एक सरस असे मोबाईल बाजारात आणत आहे. स्मार्टफोन स्वस्त आणि त्यात जवळपास सर्वच फीचर्स असावे अशी मागणी असते. त्यामुळे कंपनीचा येणारा स्मार्टफोन कसा आहे? याबाबत कुतुहूल असतं. मोटोरोला (Motorola) आपला स्मार्टफोन मोटोरोला एज 40 प्रो लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र लाँचिंगपूर्वीच या स्मार्टफोनचे फीचर्स लीक झाले आहेत. या स्मार्टफोनबाबत माहिती ऐकून अनेक जणांना याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. लीकनुसार, या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा एफएचडी प्लस डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. हा डिस्प्ले वापरकर्त्यांना चांगला अनुभव देईल, असा दावा करण्यात आला आहे. डिस्प्ले रिफ्रेश रेट 144 एचझेड असून वापरताना सहजता जाणवेल. तसेच या स्मार्टफोनची किंमत परवडणारी आहे.
कॅमेराबाबत बोलायचं झालं तरं प्रायमरी कॅमेरा 50 एमपी असणार आहे. तर 12 एमपीचा टेलिफोटो कॅमेरा मिळू शकतो. तर सेल्फीसाठी 60 एमपी कॅमेरा दिला जाऊ शकतो. परफॉर्मेंसबाबत बोलायचं झालं तर हा स्मार्टफोन सध्याच्या तंत्रज्ञानाला सपोर्ट करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर दिलं जाण्याची शक्यता आहे. स्टोरेजसाठी या स्मार्टफोमध्ये 8 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम 256 जीबी स्टोरेज ऑप्शन असेल. तसेच 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजचा पर्यायदेखील उपलब्ध असलेल. युजर्स आपल्या गरजेनुसार व्हेरियंट निवडू शकतात.
Motorola Edge 40 Pro
- 6.67" FHD+ 144Hz
- Qualcomm Snapdragon 8 Gen 2 SoC
- 8/12/16GB RAM
- 128/256/512GB storage
- Rear Cam: 50MP (OIS) + 50MP (UW) + 12MP (2x Tele)
- Front Cam: 60MP
- Android 13, MyUI
- 4,610mAh battery, 125W charging— Yogesh Brar (@heyitsyogesh) November 23, 2022
या स्मार्टफोनमध्ये युजर्संना 4610mAh बॅटरी असू शकते आणि चार्ज करण्यासाठी 125W सुपर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. या व्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ, जीपीएस, वायफाय आणि यूएसबी पोर्ट यासारखी कनेक्टिव्हिटी फीचर्स दिले जातील. हा हँडसेट Android 13 वर काम करेल.
बातमी वाचा- Tata Tigor EV नव्या अवतारात, सिंगल चार्जमध्ये कापणार 315 किमी अंतर; जाणून घ्या इतर वैशिष्ट्ये
आतापर्यंत समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, Edge 40 Pro स्मार्टफोनची किंमत 50,000 ते 55,000 रुपयांच्या दरम्यान ठेवली जाऊ शकते. तथापि, वास्तविक किंमतीची माहिती लॉन्चिंग इव्हेंटनंतरच उपलब्ध होईल. मोटोरोलाने गेल्या वर्षी Edge 30 Pro लाँच केला होता. सध्या हा फोन भारतात 39,999 रुपये किमतीत उपलब्ध आहे.