Facebook ची कमाल; लेटेस्ट अपडेट पाहून म्हणाल हे कसं शक्य आहे?

तुमच्या टेक्निकल ज्ञानात भर टाकणारी भन्नाट बातमी

Updated: Aug 11, 2022, 09:50 AM IST
Facebook ची कमाल; लेटेस्ट अपडेट पाहून म्हणाल हे कसं शक्य आहे? title=

मुंबई : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात फेसबुकच्या (facebook) मालकीची कंपनी असलेल्या Meta ने चॅट-बॉट विकसित केला आहे. हा चॅटबॉट मेटाच्या एआय रिसर्च लॅबने तयार केला आहे. मेटाकडून हा चॅटबॉट इंटरनेटवर युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या चॅटबॉटबद्दल लोकांकडून फीडबॅक मिळवण्यासाठीच हा घाट.

थोडक्यात सर्वसामान्य नागरिक कोणताही संकोच न करता Meta बरोबर संवाद साधू शकणार आहेत. हा चॅटबॉट ब्लेंडरबॉट-3 या नावाने ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आला आहे. सध्या ब्लेंडरबॉट-3 फक्त अमेरिकेत सुरू करण्यात आले असून येत्या काही दिवसांत इतर देशांमध्येही ब्लेंडरबॉट-3 (BlenderBot 3) सुरू होईल अशी माहिती मेटा कडून देण्यात आले आहे.

चॅटबॉट म्हणजे काय?
चॅटबॉट (Chatbot) मधील चॅट म्हणजे संभाषण आणि बॉट म्हणजे रोबोट. अशा प्रकारे चॅटबॉट म्हणजे बोलणारा रोबोट. ज्याचा वापर आपण संभाषणासाठी करतो. मात्र हा रोबोट प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. चॅटबॉट हा एक प्रकारचा कॉम्प्युटर प्रोग्राम आहे जो सामान्य प्रश्न-उत्तरांसाठी डिझाइन केलेला आहे.

चॅटबॉटशी कोणीही बोलू शकतं. तुम्ही चॅटबॉटला एखादा प्रश्न विचारताच, ज्याचे उत्तर त्याला माहीत असेल, तर तो लगेच त्याचे उत्तर देईल. तुम्ही एखाद्या माणसाशी जसे बोलता तसे तुम्ही चॅटबॉटशी बोलू शकता.  
चॅटबॉटचा वापर का केला जातो ?
चॅटबॉटचा वापर मोठी कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि त्यांचे सोशल मीडियावर ग्राहकांना उत्पादन आणि सेवेबद्दल माहिती देण्यासाठी करतात.  मोठमोठ्या कंपन्यांचा मोठा कस्टमर बेस असतो आणि प्रत्येक कस्टमरच्या उत्पादन आणि सेवेबाबत शंकाना उत्तर देण्यासाठी चॅटबॉटचा वापर करतात. गुगल अससिस्टंट, अॅलेक्सा, सिरी हे एक चॅटबॉटचे प्रकार आहेत.

वेबसाईटवर चॅटबॉट केल्याने युजरला त्याचा फायदा होतो. चॅटबॉटची निर्मिती मायकल मोलदिन यांनी 1994 मध्ये पहिला चॅटबॉट बनवून केली होती. जुलिया हे पहिले चॅटबॉट होते.