Maruti Suzuki Black Edition: ऑटो क्षेत्रात वेगवान तंत्रज्ञानामुळे रोजच्या रोज नवे बदल होत आहे. बाजारात एकापेक्षा एक सरस गाड्या लाँच होत आहे. भारतातही कंपन्या ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात ठेवून गाड्या सादर करत आहे. असं असलं तरी मारुति सुझुकीच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत मारुति सुझुकी ही कंपनी आघाडीवर आहे. बाजारात अनेक कंपन्या मारुति कंपनीशी स्पर्धा करतात. प्रतिस्पर्धी टाटा मोटर्स आपल्या मॉडेल्सचे डार्क एडिशन बाजारात विकते. मात्र मारुतिकडे असं स्पेशल डार्क एडिशन नव्हते. अखेर कंपनीने 40 वा वर्धापनदिनाचं औचित्य साधत प्रीमियम रिटेल नेटवर्क नेक्साच्या माध्यमातून पाच मॉडेल्सचे ब्लॅक एडिशन लाँच केले आहेत. या रंगाची ग्राहकांना भूरळ पडल्याशिवाय राहणार नाही. ब्लॅक एडिशनमध्ये इग्निस, बलोनो, सियाज, एक्सएल6 आणि ग्रँड विटारा यांचा समावेश आहे. आता या सर्व गाड्या मिडनाइट ब्लॅक शेडमध्ये उपलब्ध असतील. कंपनीने लिमिटेड एडिशन एक्सेसरित पॅकेजही सादर केलं आहे.
मारुति सुझुकी इंडिया लिमिटेडचे सीनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर शशांक श्रीवास्तव यांनी सांगितलं की, 'आम्ही मारुति सुझुकी कंपनीचा 40 वा वर्धापनदिन साजरा करत आहोत. त्याचबरोबर नेक्साला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. आम्ही नेक्सा ब्लॅक एडिशन रेंजमध्ये सादर करण्यास उत्सुक आहोत. नेक्सा ब्लॅक एडिशन आशेचं प्रतीक आहे.'
बातमी वाचा- Mobile Battery: स्मार्टफोनच्या बॅटरीबाबत होणार असा निर्णय! ग्राहकांना होणार फायदा
नेक्सा ब्लॅक एडिशन इग्निसच्या जेटा आणि अल्फा व्हेरियंट ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर सियाजचे सर्व व्हेरियंट, एक्सएल6 चे अल्फा आणि अल्फा+ व्हेरियंट, ग्रँड विटाराचे जेटा, जेटा प्लस, अल्फा, अल्फा प्लस व्हेरियंट उपलब्ध करून देणार आहे. नेक्सा ब्लॅक एडिशनच्या किमती स्टँडर्स रेंजच्या आधारे देणार आहे. म्हणजेच रेग्युलर मॉडेल आणि या गाड्यांच्या किमतीत काहीच फरक नसेल. नेक्साची सर्वात स्वस्त कार इग्निस किंमत 5.35 लाख रुपयांनी सुरु होते.