10 हजारांपेक्षा कमी किंमतीत लाँच झाला 5G स्मार्टफोन; 50 मेगापिक्सल कॅमेरा अन् दमदार फिचर्स

लावाने भारतात आपला 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या मोबाईलमध्ये अनेक दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. हा फोन 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत लाँच करण्यात आला आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 2, 2023, 04:51 PM IST
10 हजारांपेक्षा कमी किंमतीत लाँच झाला 5G स्मार्टफोन; 50 मेगापिक्सल कॅमेरा अन् दमदार फिचर्स title=

लावाने भारतात आपला 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन अत्यंत स्वस्तात मिळत आहे. कंपनीचा हा मोबाईल 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता. या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. हा हँडसेट रिंग लाइट कॅमेरा मॉड्यूलसह येतो. ही लाईट तुम्ही तुम्हाला हव्या त्या पद्धतीने कस्टमाइज करु शकता. यामध्ये तुम्हाला अँड्रॉईड 13 आणि इतर फिचर्स मिळतात. 

लावाचा हा स्मार्टफोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये येतो. कंपनीने हा स्मार्टफोन ग्लास ब्लॅक, ग्लास ब्ल्यू, ग्लास लॅव्हेंडर या रंगात लाँच केला आहे. याचा बेस व्हेरियंट 4G RAM + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 9 हजार 999 रुपये आहे. तर 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिंयंट 10 हजार 999 रुपयांत उपलब्ध आहे. 

हा स्मार्टफोन तुम्ही Amazon.in आणि लावा इंडियाच्या अधिकृत बेवसाईटवरुन खरेदी करु शकता. या स्मार्टफोनची विक्री 9 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लावा फ्री सर्व्हिस अॅट होम देत आहे. या अंतर्गत ग्राहकांना फोनसंबंधी समस्येसाठी सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्हाला घरबसल्या कंपनी ही सेवा देणार आहे. 

स्पेसिफिकेशन्स काय आहेत?

Lava Blaze 2 5G स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2.5D कर्व्ड स्क्रीन आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामध्ये ऑक्टाकोर MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 4GB RAM आणि 6GB RAM चा पर्याय मिळतो. 

यामध्ये 128GB चा स्टोरेज देण्यात आला आहे, जो तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवू शकता. हा स्मार्टफोन Android 13 वर काम करतो. यामध्ये ड्युअल सीमचा सपोर्ट मिळतो. तसंच 50MP च्या मेन लेन्सचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. 

फ्रंटला कंपनीने 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंन्सॉर, 3.5mm ऑडिओ आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.