आयपॅड, आयफोन.... Apple चं कोणतंही डिवाईस वापरत असाल, तर सरकारनं दिलाय सावधगिरीचा इशारा

Alert! CERT कडून अॅपल युजर्ससाठी सतर्क करणारा एक इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं तुम्हीही अॅपलचं कोणतंही डिवाईस वापरत असाल तर आताच पाहा...   

सायली पाटील | Updated: Nov 2, 2023, 11:08 AM IST
आयपॅड, आयफोन.... Apple चं कोणतंही डिवाईस वापरत असाल, तर सरकारनं दिलाय सावधगिरीचा इशारा  title=
Apple users and devices gets CERT In high risk warning know latest updates

Apple Alert : मागील काही दिवसांपासून भारतामध्ये अॅपलचे फोन, आयपॅड आणि इतर प्रोडक्ट्सविषयी वाढणारं वेड आणि या उपकरणांच्या खरेदीकडे वाढणारा कल पाहता आहा ही कुतूहलाची बाब राहिलेली नाही. पण, असं असलं तरीही एक सतर्क करणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या अख्त्यारित राहून काम करणाऱ्या CERT-In अर्थात कंम्प्यूटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमकडून हा इशारा देण्यात आला आहे. 

iPhone, iPad, Apple Watch आणि Apple च्या इतरही प्रोडक्ट्स संदर्भात हा इशारा देत युजर्सना याकडे तातडीनं लक्ष देण्यास सांगण्यात आलं आहे. या प्रोडक्ट्समध्ये असणाऱ्या काही त्रुटी इथं अधोरेखित करण्यात आल्या आहेत. तुम्हीही अॅपल युजर्स असाल आणि या सूचनेकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्या खासगी माहितीपर्यंत हॅकर्स अगदी सहजपणे पोहोचू शकतात. 

हेसुद्धा वाचा : शाहरुख खान आवडत नाही म्हणणारेही 'या' 10 गोष्टी वाचल्यानंतर Love You SRK म्हणतील

 

CERT-In च्या वतीनं नुकत्याच काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये अॅपल डिवाईसमध्ये असणाऱ्या त्रुटींमुळं तुमच्या खासगी माहितीचं नुकसान होऊ शकतं असा इशारा देण्यात आला आहे. ऑथरायजेशनशिवाय माहितीची देवाणघेवाण, अपेक्षित कोड जनरेट करणं, सिक्योरिटी नियमांची पायमल्ली करणं, सर्विस अटॅक, ऑथरायजेशनचे नियम न पाळणं, टारगेटेड डिवाईसला स्पूफिंगच्या माध्यमातून खराब करणं अशा धोक्याची शक्यता आहे. 

कोणकोणत्या डिवाईसमध्ये आढळल्या त्रुटी? 

14.1 पूर्वीचे Apple macOS सोनोमा वर्जन
13.6.1 पूर्वीचे Apple macOS वेंचुरा वर्जन
12.7.1 पूर्वीचे Apple macOS मोंटेरे वर्जन
17.1 पूर्वीचे Apple TVOS वर्जन
10.1 पूर्वीचे Apple watchOS वर्जन
17.1 पूर्वीचे Apple Safari वर्जन
Apple iOS वर्जन 17.1 आणि iPadoS वर्जन 17.1 च्या आधीचे वर्जन
Apple iOS वर्जन 16.7.2 आणि iPados वर्जन 16.7.2 च्या आधीचे वर्जन
Apple iOS वर्जन 15.8 आणि iPados वर्जन 15.8 च्या आधीचे वर्जन

फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावं? 

हॅकर्सपासून सुरक्षित राहू इच्छिणाऱ्यांनी iOS, macOS, tvOS, watchOS आणि Safari चे नवे वर्जन अपडेट करुन घेण्यास सांगण्यात येत आहे. असं न केल्यास तुमची सिस्टीम सहजपणे हॅक होऊ शकते. यासाठी Settings मध्ये जाऊन डिवाईसचं लेटेस्ट OS अपडेट करता येईल.