आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक करण्याची मुदत वाढली

सरकारने आधार कार्ड सीम कार्ड, पॅन कार्डसोबत जोडणे अनिवार्य केले. त्यानंतर अनेकांनी लिंक केल तर काहींनी अजूनही ते केले नाही.

Updated: Oct 5, 2017, 08:41 AM IST
आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक करण्याची मुदत वाढली title=

नवी दिल्ली : सरकारने आधार कार्ड सीम कार्ड, पॅन कार्डसोबत जोडणे अनिवार्य केले. त्यानंतर अनेकांनी लिंक केल तर काहींनी अजूनही ते केले नाही.

आधार कार्ड लिंक करण्यासाठी एक तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र त्या तारखेत अनेकांनी आधार लिंक न केल्याने आता त्याची मुदत आणखी वाढवण्यात आली आहे. जर आधार तुम्ही लिंक केले नसेल तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. 

आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक करण्याची आधीची मुदत ३१ ऑगस्ट २०१७ इतकी होती. आता ती वाढवून ३१ डिसेंबर २०१७ इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी आधार कार्ड लिंक केले नव्हते त्यांना दिलासा मिळाला आहे. 

सीम कार्डसोबत लिंक करण्याची मुदत

२८ फेब्रुवारी २०१८ ही आधार कार्ड सीम कार्डसोबत लिंक करण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही सीमसोबत आधार लिंक केले नाही तर तुमचे सीम कार्ड बंद होऊ शकते. यासंबंधीचे अलर्ट तुमच्या मोबाईलवही कंपन्यांकडून पाठवले जात आहे. 

बॅंकेत आधार कार्ड जमा करण्याची तारीख

सरकारने सर्व बॅंका आणि वित्तीय संस्थांना आपल्या ग्राहकांची माहिती केवायसी दस्तावेजावर देण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांनी लोन घेतलं आहे त्यांना त्यांचं आधार कार्ड बॅंकेत फाईल करावं लागेल. यासाठीची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१७ आहे.