जिओचा दणका, या ग्राहकांची सेवा बंद होणार

अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड इंटरनेट डेटा देणाऱ्या रिलायन्स जिओनं ग्राहकांना दणका दिला आहे.

Updated: Oct 4, 2017, 08:17 PM IST
जिओचा दणका, या ग्राहकांची सेवा बंद होणार title=

मुंबई : अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड इंटरनेट डेटा देणाऱ्या रिलायन्स जिओनं ग्राहकांना दणका दिला आहे. अनलिमिटेड कॉलिंगबाबतच्या अटी आणि नियमांमध्ये जिओनं बदल केले आहेत.

रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आता दिवसाला ३०० मिनीटांपर्यंतच कॉलिंग करता येणार आहे. जिओ कार्डचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असेल तर ३०० मिनिटांनंतर ही सेवा जिओकडून बंद केली जाऊ शकते. जिओच्या कार्डचा व्यावसायिक वापर होत असल्याचं लक्षात आल्यामुळे कंपनीनं हे पाऊल उचललं आहे.

जिओचे प्लॅन हे वैयक्तिक वापरासाठी असून त्याचा व्यावसायिक वापर होत असल्याचं लक्षात आल्यास आम्ही कारवाई करू शकतो, असं जिओकडून सांगण्यात आलं आहे. व्यावसायिक वापरासाठी जिओचं कार्ड दिवसाला ३०० मिनिट, ७ दिवसाला १,२०० मिनीटं किंवा महिन्याला ३ हजार मिनीटं वापरलं तर सेवा बंद केली जाऊ शकते.