एका झटक्यात वाढेल Internet Speed, अशी बदला सेटिंग

स्लो इंटरनेटमुळे अनेकदा संताप होतो. स्लो इंटरनेटचा सामना करावा लागू नये, यासाठी काही ट्रीक्स सांगितल्या आहेत.   

Updated: Dec 10, 2022, 11:56 PM IST
 एका झटक्यात वाढेल Internet Speed, अशी बदला सेटिंग  title=

Smartphone Internet Booster :  4G नंतर आता 5G सर्व्हिस सुरु झाली आहे. मात्र त्यानंतरही अनेकांना स्लो इंटरनेट स्पीडचा (Slow Internet)  सामना करावा लागतो. 5G असल्यानंतरही इंटरनेट स्लो का चालतं याबाबत अनेकांना माहिती नसते. जर तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल, तर आम्ही तुम्हाला काही सेटिंग्सबाबत सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये 5Gच्या वेगाने इंटरनेट स्पीड मिळेल. (know how to boost your smartphone internet follow this tricks)

अपेक्षित आणि चांगला इंटरनेट स्पीड हवा असेल, तर आधी बॅकग्राउंडला सुरु असलेले सर्व apps बंद करा. या सुरु असलेल्या apps मुळे इंटरनेट खर्च होतो. परिणामी इंटरनेट स्लो चालतं. एकाच वेळेस 3-4 फाईल्स डाऊनलोड करु नयेत. एकदाच 3-4 फाईल्स डाऊनलोड केल्यास कोणतीही फाईल लवकर डाऊनलोड होत नाही. तसेच वेब सर्फिंग करता येत नाही.

मोबाईलमध्ये नको असलेल्या फाईल्स डीलीट करा. ज्यामुळे मोबाईलमधील स्टोरेज कमी होईल परिणामी इंटरनेट स्पीड चांगला मिळेल. सोबतच मोबाईलमध्ये नको असलेले एप्स असतील तर ते आताच्या आता डिलीट करा. कारण असे एप्स हे इंटरनेट खातात ज्यामुळे त्याचा स्पीडवर परिणाम होतो. सर्वात आधी सिम कार्डच्या सेटिंगमध्ये 5 जी नेटवर्क निवडा. 5 जी कनेक्टिव्हिटीसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 5जी नेटवर्क निवडा.