प्रकार एक पण इमोजी अनेक, एकाच प्रकारच्या विविध रंगी इमोजीचा अर्थ काय?

 व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग करताना एकाच प्रकारच्या अनेक इमोजी पाहिल्या असतील.

Updated: Jul 9, 2021, 07:41 PM IST
प्रकार एक पण इमोजी अनेक, एकाच प्रकारच्या विविध रंगी इमोजीचा अर्थ काय? title=

मुंबई : अनेक लोकप्रिय अ‍ॅप्सपैकी एक म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप. व्हॉट्सअपचा दररोजच्या जीवनात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी चॅटिंगसह अनेक जण इमोजीचा वापर करतात. पण तुम्ही चॅटिंग करताना एकाच प्रकारच्या अनेक इमोजी पाहिल्या असतील. या इमोजीचा रंग वेगवेगळा असला तरी, त्या इमोजी दिसायला मात्र एकसारख्याच असतात. हात जोडल्याच्या तसेच नमस्कार करत असल्याचं या इमोजीतून सूचित होतं. पण काही जणांचं असंही म्हणंन आहे की या इमोजीचा अर्थ हाय फाईव्ह असाही होतो.   

हाय फाईव्ह म्हणजे एकमेकांना टाळी देणं.  तर काही जणांचा असाही दावा आहे की या इमोजी हाय फाईव्ह नसून प्रे इमोजी म्हणजे प्रार्थना करत असल्याचं सूचवण्यासाठी आहे. यावरुन नेटीझन्समध्ये चर्चा रंगते. या इमोजीचा अर्थ आणि त्या नेमक्या केव्हा वापरायच्या, हे जाणून घेऊयात. 

योग्य काय? 

या इमोजीबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर, या इमोजी प्रे इमोजी असल्याचं निदान झालं. या इमोजीतून आपण हाथ जोडल्याचं सिद्ध होतं. त्यामुळे या इमोजीचा वापर आपण नमस्कार आणि प्रार्थना करण्यासाठी करु शकता.

आता तुम्ही म्हणाल की ही इमोजी प्रे इमोजीच आहे, या मागील तर्क काय? तर ते ही जाणून घेऊयात. या एकसारख्या दिसणाऱ्या इमोजीमागील अर्थ एकच आहे. फक्त इमोजीत दिसणाऱ्या हातावरील कपड्यांचा रंग वेगळा आहे. जर या हाय फाईव्ह इमोजी असत्या तर त्यात 2 हात असते अन् दोन्ही व्यक्तींच्या हाताचा रंगात फरक असतो.