महिंद्रा स्कॉर्पिओ-एन मध्ये 'या' पाच उणीवा! खरेदी करण्यापूर्वी नक्की जाणून घ्या

नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एनची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा होत आहे. या गाडीची किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

Updated: Jul 12, 2022, 01:48 PM IST
महिंद्रा स्कॉर्पिओ-एन मध्ये 'या' पाच उणीवा! खरेदी करण्यापूर्वी नक्की जाणून घ्या title=

Mahindra Scorpio-N's Top 5 Cons: नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एनची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा होत आहे. या गाडीची किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरू होते, जी त्याच्या Z2 (पेट्रोल) व्हेरियंटसाठी आहे. टॉप व्हेरियंटच्या किमती अद्याप उघड करण्यात आल्या नसल्या तरी,  21 ते 22 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असं सांगण्यात येत आहे. तुम्ही आतापर्यंत या नवीन Scorpio-N च्या सर्व वैशिष्ट्यांबद्दल ऐकले असेल, म्हणून आज आम्ही तुम्हाला त्यातील काही उणीवांबद्दल सांगणार आहोत. येथे नमूद केलेल्या उणीवा इतरांना सामान्य वाटू शकतात.

स्टीयरिंग एडजस्टमेंट

नवीन Scorpio-N मध्ये टेलिस्कोपिक स्टीयरिंग ऍडजस्टमेंट नाही, जे या किमतीच्या श्रेणीमध्ये उपलब्ध असायला हवे होते. तुम्हाला फक्त स्टीयरिंग वर आणि खाली हलवण्यासाठी अॅडजस्टमेंट मिळते.

थर्ड रो एसी वेंट

नवीन Scorpio-N च्या तिसऱ्या रांगेत AC व्हेंट्स नाही. तथापि, दुस-या रांगेतील एसी व्हेंट्सचा प्रवाह जास्त चांगला आहे, ज्यामुळे कूलिंग मागील भागापर्यंत पोहोचू शकते, परंतु ते व्यवस्थित थंड होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

थर्ड रो स्पेस

तिसर्‍या रांगेत हवी तशी जागा नाही. मुले आरामात बसू शकतात, परंतु 5.8 किंवा 5.9 इंच किंवा त्याहून अधिक उंचीच्या लोकांना येथे जास्त वेळ बसणे कठीण जाईल. 

एमएलडी

नवीन Scorpio-N च्या रियर व्हील ड्राइव्ह आवृत्तीला एमएलडी (मेकॅनिकल लॉकिंग रिअर डिफरेंशियल) मिळत नाही, ज्यामुळे ती थोडी कमी ऑफ-रोड एसयूव्ही बनते. तथापि, एमएलडी त्याच्या 4-व्हील ड्राइव्ह आवृत्तीमध्ये उपलब्ध आहे.

इंधन कार्यक्षमता

पेट्रोल प्रकारात इंधन कार्यक्षमता खूपच कमी आहे. पेट्रोल (स्वयंचलित) आरामात चालवल्यास 10km ते 11km ची इंधन कार्यक्षमता देऊ शकते (जलद गाडी चालवल्यास आणखी कमी होईल). तथापि, असे देखील म्हणता येईल की जर इंजिन मोठे असेल तर इंधन कार्यक्षमता कमी असेल.