मुंबई : कोठे नोकरी मिळेल का, याच्या शोधात अनेकजण असतात. जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी गुडन्यूज आहे. मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. १८२ पदांसाठी ही भरती होत आहे. तीन जूनपासून ही प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ जून २०१९ आहे. त्यामुळे पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. सर्व उमेदवारांसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन शुल्क म्हणून २५ रुपये भरावे लागणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात १८२ पदांसाठी भरती होत आहे. अर्ज भरण्याची सुरूवात ३ जून २०१९ पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून २०१९ आहे. तर परीक्षा शुल्क भरण्याची तारीख १७ जून २०१९ आहे. दरम्यान, या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
या भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गासाठी वयोमर्यादा ४३ वर्षे आहे) अशी आहे. मुंबईसाठी ही भरती होत आहे. उमेदवारीची शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून मिळालेली कुठल्याही शाखेची पदवी असावी. तसेच इंग्रजी टायपिंगचा वेग ४० शब्द प्रति मिनिट इतका आवश्यक असून शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र आवश्यक गरजेचे आहे. उमेदवाराला संगणकाचे ज्ञान (वर्ल्ड प्रोसेसर विंडो, एम एस वर्ल्ड, मायक्रोसॉफ्ट ऑफिस) आवश्यक आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज भरण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाची अधिकृत जाहिरात पाहावी. त्यानंतरच आपला अर्ज करावा. भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php या लिंकवर क्लिक करा. इच्छुक उमेदवार मुंबई उच्च न्यायालयाच्या https://bhc.gov.in/bhcclerk/home.php या अधिकृत वेबसाइटवरुन आपला अर्ज भरु शकतात. (जाहिरात पाहा)