मुंबई : जिओ नेहमीच ग्राहकांसाठी नव्या ऑफर्स बाजारात आणत असतो. आता सुद्धा रिलायन्स जिओ ग्राहकांना ४४४ आणि ५५५ रुपयांच्या प्रीपेड प्लान्सवर सवलत देत आहे. या ऑफरसाठी कंपनीने Paytm सोबत पार्टनरशीप केली आहे. 'शुभ पेटीएम' असं नव्या ऑफरचं नाव आहे. या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना ४० ते ५० रूपयांची सूट मिळणार आहे.
जिओच्या ४४४ रूपयांच्या प्रीपेड प्लानवर सूट मिळवण्यासाठी 'SHUBH44' हा प्रोमोकोड वापरल्यास ४४ रुपये आणि ५५५ रुपयांच्या प्रीपेड प्लानसाठी SHUBH50 हा प्रोमोकेड वापरल्यास ५० रुपयांची सवलत मिळणार आहे.
फक्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पेटीएमद्वारे रिचार्ज करावा लागणार आहे. या 'शुभपेटीएम' योजनेचा लाभ तुम्ही १५ नोव्हेंबर पर्यंत घेवू शकता. मागील महिन्यात जिओने आऊटगोइंग चार्ज लागू केले आहेत. त्यामुळे हे दोन्ही प्रीपेड प्लान्स फायदेशीर म्हणून ग्राहकांसाठी आणले आहेत.
४४८ प्लानमधील खास वैशिष्ट्य
- ग्राहकांना दररोज जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग
- २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस
- ८४ दिवसांची वैधता
- इतर कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी प्रति मिनिट IUC ६ पैसे मोजावे लागतील.
५५५ प्लानमधील खास वैशिष्ट्य
- या प्लानमध्ये ग्राहकांना ४४४ रूपयांच्या प्लानच्याच सुविधा मिळणार आहेत.
- ४४४ रुपयांच्या रिचार्जमध्ये १,००० तर ५५५ रुपयांच्या रिचार्जमध्ये ३,००० आययूसी मिनिटे मिळतात.