सरकारने Twitterकडून मागवली ४७४ अकाऊंटची माहिती

सरकारने ट्विटरकडे ४७४ अकाऊंटची माहिती उपलब्ध करुन देण्याचं सांगितलं आहे. 

Updated: Nov 2, 2019, 05:18 PM IST
सरकारने Twitterकडून मागवली ४७४ अकाऊंटची माहिती title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : भारत सरकारने मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरकडे ४७४ अकाऊंटची माहिती उपलब्ध करुन देण्याचं सांगितलं आहे. यासोबतच सरकारने या वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांच्या दरम्यान कायद्याचे उल्लंघन करणारी ५०४ अकाऊंट बंद करण्यास किंवा त्याचा डेटा काढून टाकण्याची विनंती केली आहे. ट्विटरच्या एका अहवालानुसार, माहिती विनंतीच्या पाच टक्के प्रकरणात ट्विटरने भारत सरकारला मदत केली आणि अकाऊंट हटविण्याच्या विनंतीवरुन एकूण सहा टक्के प्रकरणांची दखल घेतली आहे.

भारताकडून जवळपास १ हजार २६८ ट्विटर अकाऊंटची माहिती मिळवण्याची आणि २ हजार ४८४ अकाऊंट हटवण्याचं सांगण्यात आलं होतं. 

भारत सरकारने जुलै ते डिसेंबर २०१८ या कालावधीत ४२२ ट्विटर अकाऊंटच्या माहितीची विनंती केली होती. तर कायदा अंमलबजावणी संस्थेकडून (Law enforcement) ट्विटरवरुन कायद्याचं उल्लंघन करणारी ६६७ ट्विटर अकाऊंट हटवण्याचं सांगण्यात आलं होतं. 

ट्विटर अकाऊंटबाबत माहिती मिळवण्यासाठी विनंती करण्यात अमेरिकी सरकार आघाडीवर होती. 

 

कंपनीने सांगितलं की, आम्ही मागील अहवालाच्या तुलनेत, ११९ टक्के अधिक खाती निलंबित केली आहेत. ट्विटरने या काळात बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित उल्लंघनांसाठी एकूण दोन लाख २२ हजार १८८ खाती निलंबित केली.