JIO बंपर धमाका : ६ महिने फ्री अनलिमिटेड डेटा

६ महिने अनलिमिटेड कॉल्ससोबतच अनलिमिटेड ४ जी डेटादेखील मिळणार आहे. 

Updated: Jul 31, 2018, 06:34 PM IST
JIO बंपर धमाका : ६ महिने फ्री अनलिमिटेड डेटा  title=

नवी दिल्ली : रिलायन्स जियोने आपल्या युजर्ससाठी धमाकेदार प्ला आणलायं. जियोने केवळ ५९४ रुपयांत मान्सून हंगामा ऑफर आणलीयं. यामध्ये ६ महिने अनलिमिटेड कॉल्ससोबतच अनलिमिटेड ४ जी डेटादेखील मिळणार आहे. यासोबतच अनेक ऑफर्स मिळणार आहेत.

५९४ रुपयांमध्ये बरचं काही 

या प्लानमध्ये ६ महिन्यापर्यंत अनलिमिटेड फ्री डेटा देण्यात आलायं. यासोबतच अनलिमिटेड एसएमएसदेखील मिळताहेत. यव्यतिरिक्तही आणखी दोन प्लान बाजारात आणले आहेत.

९९ रुपयांचा प्लान 

या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलिंगसोबतच फ्री एसएमएस (दररोज १०० एसएमएस) आणि रोज ५०० एमबी ४ जी डेटा दिला जाईल. या प्लानची वॅलिडीटी २८ दिवसांची आहे. हा प्लान मुख्यत्वे जियो फोन आमि जियो फोन २ युजर्ससाठी असणार आहे. यानुसार एकूण १४ जीबी डेटाचा लाभ युजर्सना घेता येणार आहे.

जियो १५३ रुपयांचा प्लान 

या प्लानमध्ये युजर्स दररोड १.५ जीबी ४ जी डेटाचा लाभ २८ दिवस घेऊ शकणार आहे. युजर्सना एकूण ४२ जीबी डेटा मिळणार असून अनलिमिटेड वॉईस कॉल आणि फ्री एसएमएस (रोज १००) मिळणार आहेत. जियोचा फिचर फोन २ ची विक्री १५ ऑगस्टपासून होणार आहे.