मुंबई : भारतात ड्युएल सिम सपोर्ट असणाऱ्या स्मार्टफोनची चांगलीच चलती आहे... तशीच आयफोनचीही क्रेझ तरुणांमध्ये दिसून येते... परंतु, आत्तापर्यंत आयफोनमध्ये मात्र ड्युएल सिमची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळेच अनेक भारतीय आयफोन घेण्याची आपली इच्छा मागे टाकतात. त्यामुळेच, आता आपल्या युझर्ससाठी पुढच्या आयफोनमध्ये ड्युएल सिम सपोर्टची सुविधा उपलब्ध करून दिला जाईल, असं सांगण्यात येतंय.
iOS 12 च्या डायग्नोस्टिक रिपोर्टमध्ये सिमस्लॉटचा उल्लेख करण्यात आलाय. यामध्ये असणाऱ्या दुसऱ्या सिम स्टेटसमुळे iOS 12 मध्ये दोन सिम वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाऊ शकतो, असं म्हटलं जातंय.
येत्या सप्टेंबरपर्यंत आयफोनच्या एका व्हेरिएन्टमध्ये ड्युएल सिम सपोर्ट दिला जाईल, असं सांगण्यात येतंय. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी तीन नवे आयफोन लॉन्च करणार आहे.