मुंबई : तुम्ही जिओ ग्राहक आहात तर तुम्हाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना अलर्ट केलंय. कंपनी एक सर्व्हिस बंद कऱणार आहे.
२७ फेब्रुवारीनंतर जिओची जिओ मनी मोबाईल वॉलेट सर्व्हिस बंद करणार आहे. जिओने एसएमएसद्वारे याबाबतची माहिती आपल्या ग्राहकांना दिलीये. आरबीआयच्या गाईडलाईननंतर हा निर्णय घेण्यात आलाय.
आरबीआयच्या गाईडलाईननुसार, मोबाईल वॉलेटद्वारे पैसे बँकेत ट्रान्सफर करण्याची सुविधा बंद केली जाणार आहे. हा नियम २७ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. दरम्यान २७ फेब्रुवारीआधी ग्राहक पैसे ट्रान्सफर करत असतील तर त्यांना कोणत्याही प्रकारचे चार्ज लागणार नाहीत.
एका न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार,जेव्हा कंपनीकडून आरबीआयच्या गाईडलाईन्स बाबत माहिती मागवण्यात आली तेव्हा कंपनीने ही माहिती पुरवली नाही. दरम्यान, जेव्हा एजन्सीने रिलायन्स जिओच्या कस्टमर केअरकडे याबाबत माहिती मागितली तेव्हा सांगण्यात आले की लायसन्स घेतले जात आहे. जिओ पेमेंट बँक लवकरच ऑपरेशन सुरु करणार आहे. यानंतर जिओ मनीद्वारे पैसे बँकेत आरामात ट्रान्सफर होऊ शकेल.