अखेर तुमची मागणी Jio ने केली मान्य; कंपनीकडून 28 नव्हे तर इतक्या दिवसांची वैधता

Jio ने काही काळापूर्वी एक नवीन प्रीपेड प्लॅन जाहीर केला. ज्यामध्ये तुम्हाला जबरदस्त फायदे मिळणार आहेत. TRAI च्या आदेशानंतर हा प्लॅन लाँच करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

Updated: Mar 29, 2022, 11:50 AM IST
अखेर तुमची मागणी Jio ने केली मान्य; कंपनीकडून 28 नव्हे तर इतक्या दिवसांची वैधता  title=

मुंबई : Reliance Jio ने काही दिवसांपूर्वी नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची वैधता ही ट्रायच्या आदेशानंतर देण्यात आली आहे. या नवीन प्लॅनची ​​किंमत 259 रुपये आहे आणि या प्लॅनची वैधता एका महिन्याची असणार आहे.  जिओने या प्लॅनसह ट्रायच्या कोणत्या सूचना स्वीकारल्या आहेत आणि यामध्ये तुम्हाला इतर कोणते फायदे दिले जात आहेत पहा...

जिओकडून ट्रायच्या आदेशाचे पालन 

या वर्षी (जानेवारी 2022) भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI कडून एक आदेश जारी करण्यात आला होता. यामध्ये, सर्व टेलिकॉम कंपन्यांना किमान एक प्लॅन व्हाउचर, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते ज्याची वैधता 28 दिवस ऐवजी पूर्ण 30 दिवस असेल. ग्राहक हे प्लॅन पुढील महिन्यात त्याच तारखेला पुन्हा रिचार्ज करू शकतात. 

जिओचा नवीन प्लॅन लॉन्च

ट्रायच्या आदेशानंतर जिओने २५९ रुपये किमतीचा प्लॅन लॉन्च केला आहे. जिओचा हा पहिलाच प्लॅन आहे ज्याची वैधता २८ दिवस नाही तर ३० दिवसांची आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटा दिला जाईल, त्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल.

या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस आणि कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगचा लाभ मिळतो. तसेच, तुम्ही या प्लॅनमधील सर्व जिओ अॅप्स देखील वापरू शकता.