जिओ युजर्ससाठी खुशखबर : 8 जीबी डेटा मोफत

जिओ आपल्या युजर्सना ८ जीबी डेटा मोफत देत आहे. 

Updated: May 28, 2018, 01:57 PM IST
जिओ युजर्ससाठी खुशखबर : 8 जीबी डेटा मोफत title=

मुंबई : तुम्ही जर जिओ युजर आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओ आपल्या युजर्सना ८ जीबी डेटा मोफत देत आहे. हा डेटा युजर्सना Jio Cricket Pack अंतर्गत दिला जाणार आहे. जियो क्रिकेट पॅकची किंमत १०१ रुपये आहे. यामध्ये युजर्सना ४ दिवस रोज २ जीबी डेटा जास्त मिळणार आहे.मायजिओ अॅपमध्ये माय प्लान सेक्शनमध्ये जाऊन ही ऑफर तुमच्यासाठी आहे की नाही याची माहिती घेऊ शकता. मोफत दिल्या जाणाऱ्या या अॅ़ड ऑन पॅकची किंमत १०१ रुपये सांगितली जात आहे. या अॅड ऑन पॅकमध्ये यूजरला कॉलिंग आणि एसएमएस पाठविण्याची सुविधा नसणार आहे.

८ जीबी डेटा मोफत 

इंडियन प्रिमियर लिग २०१८ संपली आहे. जिओने आपल्या सबस्क्रायबर्सना आयपीएलची शेवटची प्लेऑफ आणि फायनल मॅच पाहण्यात अडचण होऊ नये यासाठी नवा डेटा पॅक ऑफर केला.