अमेझॉनच्या 'Alexa' स्मार्ट स्पीकरने केली मोठी चूक

जसजसे प्रगत तंत्रज्ञान पुढे येत आहे तसतसे त्यामधील त्रुटी आणि प्रायव्हसीचा मुद्दादेखील समोर येत आहे. 

Updated: May 27, 2018, 05:26 PM IST
अमेझॉनच्या 'Alexa' स्मार्ट स्पीकरने केली मोठी चूक  title=

मुंबई : जसजसे प्रगत तंत्रज्ञान पुढे येत आहे तसतसे त्यामधील त्रुटी आणि प्रायव्हसीचा मुद्दादेखील समोर येत आहे. स्मार्टफोन, स्मार्ट वॉच किंवा अगदी नुकताच बाजारात आलेला स्मार्ट स्पीकर असो. या सार्‍या प्रगत तंत्रज्ञानाच्या गोष्टींमुळे आपलं आयुष्य सुकर झाल्यासारखे वाटत असले तरीही तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित असेलच असे नाही.  

अलेक्साने वैयक्तिक माहितीचा केला प्रसार -  

सिआटेल येथील टेलिव्हिजन स्टेशन 'किरो'च्या रिपोर्टनुसार, पोर्टलॅन्डमध्ये अमेझॉनच्या स्मार्ट स्पीकरने एका जोडप्याचा वैयक्तिक संवाद परस्पर कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तीला पाठवल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. 

अमेझॉनने स्वीकारली चूक  

डेनियल या व्यक्तीने संबंधित प्रकरणी अमेझॉनकडे तक्रार केली. या प्रकारणी चूक कबुल करत कंपनीने माफी मागितली आहे. सोबतच या कंपनीने या प्रकरणी त्यांची बाजू मांडताना अलेक्साने नेमके असे का केले? याबाबत माहिती दिली आहे. 

नेमके काय घडले? 

कंपनीच्या म्हणण्यानुसार, Alexaने असा विचार केला की त्या जोडप्याने डिव्हाईसला अ‍ॅक्टिव्ह होण्याचा मेसेज दिला. त्यानुसार जेव्हा चुकीतून 'सेन्ड मेसेज' असे ऐकले तेव्हा त्यांचा सुरू असलेला मेसेज कॉन्टॅक्ट लिस्टमधील एका व्यक्तीला पाठववण्यात आला. भविष्यात अशाप्रकारची चूक होणार नाही याबाबत दक्षता घेणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.