Google गुपचुप ऐकतोय तुमचं बोलणं? फक्त या काही सेटींग बदला आणि निश्चिंत व्हा

Stop Google Monitor Activity: तुम्हालाही असं वाटतं का की आसपास तुम्ही जे बोलतात त्या संबंधीच्या जाहिराती गुगल तुम्हाला दाखवते. असं का होतं आणि हे थांबवण्यासाठी काय करायचं चला बघूया.

Updated: Aug 25, 2024, 05:48 PM IST
Google गुपचुप ऐकतोय तुमचं बोलणं? फक्त या काही सेटींग बदला आणि निश्चिंत व्हा title=

जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी किंवा घरच्यांशी एखाद्या वस्तू, ठिकाण किंवा विषयाबद्दल बोलतात तेव्हा गुगल तुम्हाला त्याच संबंधीत जाहिराती दाखवायला सुरुवात करतो. समजा तुम्ही एखाद्या विशेष बॅन्डचे घड्याळ घेण्याबद्दल बोलत असाल, तर तुम्हाला घड्याळासंबंधीत जाहिराती बघायला मिळतात. हे फक्त तुमच्याच सोबत होते असं नाही. ही गोष्ट अनेक यूजर्स सोबत घडताना दिसते. पण नेमकं असं का होतं हे समजून घेऊया.

तुम्ही जे बोलतात त्या संबंधीच्या जाहिराती बघायला मिळतात. कारण गुगल तुमचे बोलणे गुपचुप ऐकतो आणि त्या आधारावर जाहिराती दाखवतो. अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये तुम्हाला गुगलच्या अनेक सुविधा मिळतात. जसे की जीमेल, प्ले स्टोर, गुगल चॅट इत्यादी. पण या सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला गुगलचे अकाउंट उघडावे लागते किंवा जुन्या अकाउंटनी लॉग इन करावे लागते. त्यानंतर तुम्ही गुगलच्या या अन्य सेवांचा लाभ घेऊ शकतात. काही वेळा यूजर अशा काही गोष्टींना परवानगी देतात की त्यामुळे गुगल तुमचे सगळे बोलणे ऐकू शकतो. जर तुम्हाला वाटते की असं होऊ नये तर तुम्हाला गुगलच्या काही सेटिंगमध्ये बदल करावा लागेल.

सेटिंगमध्ये कोणता बदल करावा लागेल-
1. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जा.
2. त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि गुगल या पर्यायावर क्लिक करा.
3. मग एक नवीन पेज ओपन होईल ज्यात तुम्हाला गुगल प्रोफाईल दिसेल.
4. इथे तुम्ही Manage your Google Account या पर्यायावर क्लिक करा.
5. मग परत एक नवीन पेज उघडेल. 
6. आता तुम्ही Data and privacy यावर क्लिक करा. 
7. खाली स्क्रोल करा आणि Web & App Activity पर्यायावर क्लिक करा. 
8. इथे तुम्हाला Include voice and audio activity ऑप्शन मिलेगा. 
9. यावरच्या टिकला काढून टाका.
10. यामुळे गूगलला तुमच्या स्मार्टफोनच्या माइक्रोफोनचा एक्सेस मिळणार नाही आता गुगलला तुमचे बोलणे ऐकू येणार नाही.