iPhone 14 Price Cut: अॅपल कंपनी पुढच्याच आठवड्यात iPhone 15 सीरीज लाँच करत आहे. कंपनीकडून 12 सप्टेंबर रोजी मोठा लाँचिग इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. नवीन आयफोन सीरीजच्या लाँचिगची तारीख जशीजशी जवळ येतेय तशी आयफोन लव्हर्सची उत्सुकताही वाढत आहे. त्याचबरोबर, आयफोन 14 व्हेरियंटची किंमतीतही घट झाली आहे. आयफोन 15 लाँच होण्याआधी 14ची किंमत कमी झाली आहे. मात्र, आयफोनच्या स्टोअरमध्ये तुम्हाला कमी किंमतीत फोन मिळणार नाहीये तर फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साइटवर तुम्हाला अर्ध्या किंमतीत आयफोन खरेदी करण्याची संधी आहे. कशी ते जाणून घ्या.
फ्लिपकार्टवर आयफोनची किंमत कमी करण्यात आली आहे. जर, तुम्हाला आयफोन खरेदी करायचा आहे पण तुमचं बजेट कमी आहे तर तुम्ही आयफोन 14 खरेदी करु शकता. Flipkart Mobiles Bonanza Sale 3 सप्टेंबरपासून सुरू झाला असून 9 सप्टेंबरपर्यंत हा सेल सुरू राहणार आहेत. या सेलअंतर्गंत iPhone 14 तुम्ही 13,999 रुपयापर्यंत खरेदी करता येऊ शकतो. जाणून घ्या कसं ते.
iPhone 14 ची किंमत 79,000 रुपये इतकी आहे. मात्र फ्लिपकार्टवर 67,999 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच पूर्ण 11,901 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. त्याचबरोबर बँक आणि एक्सचेंज ऑफरही देण्यात येत आहे. यामुळं फोनची किंमत खूपच कमी झाली आहे. आयफोन 14 खरेदी करण्यासाठी जर तुम्ही HDFCच्या क्रेडिट कार्डने पेमेंट करणार असाल तर तुम्हाला4 हजारांचा डिस्काउंट मिळणार आहे. त्यानंतर फोनची किंमत 63,999 रुपये इतकी होईल. मात्र, तुम्ही त्यानंतरही एक्सचेंज ऑफरच्या सहाय्याने फोनची किंमत अजून कमी होऊ शकते.
iPhone 15 सीरीज 12 सप्टेंबर 2023 ला लाँच होणार आहे. या सीरीजमध्ये आयफोनचे चार मॉडल आईफोन 15, आईफोन 15 Pro, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Ultra आहेत. या वर्षी लाँच होणारा आयफोन अनेक बाबतीत खास आहे. त्यामुळं आयफोनचे खास फिचर काय असतील जाणून घेऊया.