iPhone 15 लाँच होण्याआधीच अ‍ॅपलला झटका; 'या' देशात अधिकाऱ्यांच्या आयफोन वापरावर बंदी

iPhone In Government Offices iPhone 15: सप्टेंबरमध्ये आयफोन 15 सीरीज लाँच होत आहे. मात्र, त्यापूर्वीच अॅपल कंपनीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. चीनने सरकारी अधिकाऱ्यांच्या आयफोन वापरावर बंदी घातली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 7, 2023, 11:09 AM IST
iPhone 15 लाँच होण्याआधीच अ‍ॅपलला झटका; 'या' देशात अधिकाऱ्यांच्या आयफोन वापरावर बंदी title=
China Ban iPhone in government offices over China US Tension

iPhone In Government Offices iPhone 15: सीरीज सप्टेंबरमध्ये लाँच होत आहे. भारतातच नव्हे तर जगभरातील नागरिकांना आयफोनचे आकर्षण आहे. मात्र, भारताच्या शेजारी देशाने आयफोनविरोधात एक  फतवा जारी केला आहे. देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना आयफोनचा वापर करण्यास व कार्यालयात अॅपलचे इतर उत्पादने आणण्यास विरोध केला आहे. या निर्णयामुळं एकच खळबळ माजली आहे. भारताच्या शेजारी असलेल्या चीनने ही घोषणा केली आहे. चीनने अॅपल आयफोन किंवा अन्य विदेशी ब्रँडच्या डिव्हाइसचा वापर करण्यास विरोध केला आहे. अॅपल इव्हेंटच्या आधीच चीनने हा बॅन लावल्याने चीन आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. 

WSJने जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार, चीनने अॅपल व्यतिरिक्त अन्य फोन निर्मात्यांचे नाव घेतले नाहीये. अॅपल आणि चीनच्या स्टेट काउन्सिल इन्फॉर्मेशम ऑफिसकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाहीये. चीन देशातील नागरिकांच्या आणि देशाच्या डेटासंबंधी चिंतेत आहे. अशातच चीनी सरकारने त्यांच्या सगळ्या सरकारी कंपन्यांना टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भर होण्यास सांगितले आहे. जेणेकरुन तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिकेलाही टक्कर देता येऊ शकते. 

चीनने बीजिंगमध्ये उचललेले हे पाऊल अॅपलसाठी धोक्याचे ठरु शकते. चीनहीच अमेरिकेनंतरची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. चीनचे हे पाऊल देशात स्वदेशी ब्रँडच्या वापराला प्रोत्साहन देणारे असल्याचेही बोलले जात आहे. याशिवाय चीन आणि अमेरिकेतील वाढत्या तणावामुळे अॅपलने आपले उत्पादन भारतात पसरवले आहे. त्यामुळे हळूहळू भारतात त्याचा बाजार व्यापला जाईल असे सांगितले जात आहे. त्यामुळेच चीनने आयफोन न वापरण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. आयफोनची नवीन सीरीज लवकरच लॉन्च होणार आहे. iPhone 15 सीरीज लॉन्च होण्यापूर्वी चीनच्या या निर्णयाचा कंपनीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

अमेरिका आणि चीनमध्ये चिप इंडस्ट्रीवरुनही तणाव वाढत आहे. . चीनची मक्तेदारी संपवण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. चिपमध्ये जे काही घटक वापरले जातात त्यावर अमेरिका बंदी घालत आहे. याला प्रत्युत्तर देत चीनने अमेरिकन विमान निर्माता कंपनी बोईंग आणि चिप कंपनी मायक्रोन टेक्नॉलॉजीसह अनेक शिपमेंटवर बंदी घातली आहे.

कधी होणार आयफोन लाँच

iPhone 15 सीरीज 12 सप्टेंबर 2023 ला लाँच होणार आहे. या सीरीजमध्ये आयफोनचे चार मॉडल आईफोन 15, आईफोन 15 Pro, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Ultra आहेत. या वर्षी लाँच होणारा आयफोन अनेक बाबतीत खास आहे. त्यामुळं आयफोनचे खास फिचर काय असतील जाणून घेऊया.