iPhone 14 : Apple iPhone 14 सप्टेंबर महिन्यात लाँच होणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. पण, त्यासंदर्भातील कोणतीही अधिकृत घोषणा मात्र अद्यापही करण्यात आलेली नाही. अॅपलच्या इवेंट पॅटर्न्सवर नजर टाकल्यास 13 सप्टेंबरला आपण Apple iPhone 14 लाँच होण्याची अपेक्षा ठेवू शकतो. काही इतर चर्चांमधून मात्र 7 सप्टेंबर ही Launch Date सांगण्यात येत आहे. (iPhone 14 launch know the price features versions camera and other details )
iPhone 14 Pro असू शकतो महाग
अॅपल विश्लेषक Ming-Chi Kuo यांनी दिलेल्या माहितीनुसार Apple iPhone 14 Pro हे मॉडेल काही अंशी महाग असू शकतं. Kuo यांच्या सांगण्यानुसार यावेळी आयफोनच्या किंमती 15 टक्क्यांनी वाढू शकतात. म्हणजेच $1,000 iPhone प्रो ची किंमत $1,050 इतकी असू शकते.
iPhone 14 प्रो आणि प्रो मॅक्समध्ये कमीत कमी 256GB इंटरनल स्टोरेज पासून सुरु होतील. 128GB हून दुपटीनं स्टोरेज देणार असल्यामुळंच दर वाढल्याचं सांगण्यात येत आहे.
सप्टेंबर महिन्यात अॅपल चार नवे मॉडेल लाँच करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max चा समावेश आहे. Apple iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max यांना नवं डिझाईन दिलं जाण्याची शक्यता आहे.
आणखी एक Surprise
येत्या काळात अॅपल वॉचची सीरिज 8 सुद्धा लाँच होणार आहे. अॅपल वॉच एसई मॉडल आणि वॉच प्रोचं सुद्धा अनावरण केलं जाणार आहे. Apple iPhone 14 चा लाँच इवेंट 12 सप्टेंबरला सायंकाळीही आयोजित करु शकतो. दरवर्षी Apple कडून सप्टेंबर महिन्यात नवं प्रोडक्ट लाँच करण्याच येतं. पण, 2020 मध्ये कोविड महामारीमुळं ते शक्य होऊ शकलं नव्हतं.