‘या’ तारखेपासून Flipkart Big Billion Days सेल; iPhone 13, वॉशिंग मशीन, एसी, स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर

Flipkart Big Saving Days Sale : आयफोन (Iphone) खूप महाग असल्याने प्रत्येकाल खरेदी करणे शक्य होत नाही. मात्र ज्यांना आयफोन खरेदी करायचा असेल तर त्यांना काही प्रमाणात शक्य होणार आहे. कारण फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेल डीलमध्ये तुम्हाला हा फोन तुमच्या बजेटमध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: May 1, 2023, 04:57 PM IST
‘या’ तारखेपासून Flipkart Big Billion Days सेल; iPhone 13, वॉशिंग मशीन, एसी, स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर title=
Flipkart Big Saving Days Sale

Flipkart Big Saving Days Sale : iPhone 13 हा जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोनपैकी एक आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारामध्ये आयफोन 13 ला ही मोठी मागणी देखील आहे. या फोनची जबरदस्त लुक, स्पेसिफिकेशन्स, सिक्युरिटी फीचर्समुळे Apple iPhone 13 ची किंमत देखील सर्वांना परवडेल अशी नाही. म्हणूनच अनेकांची इच्छा असूनही पैशांअभावी अनेकजण हा महागडा स्मार्टफोन खरेदी करू शकत नाहीत. आयफोन खूप महाग असल्याने तो प्रत्येकाला खरेदी करणे शक्य नाही. मात्र आता ज्यांना आयफोन खरेदी करायचा आहे त्यांचे स्वप्न नक्कीच सत्यात उतरण्याची शक्यता आहे. कारण फ्लिपकार्टवर बिग डिल सेव्हींग सेल सुरू होणार असून हा फोन तुमच्या बजेटमध्ये खरेदी करण्याची संधी मिळेल. या डील अंतर्गत तुम्हाला भरघोस सूट मिळणार आहे. (Flipkart Big Saving Days Sale)

काय आहे फ्लिपकार्ट डील?

भारतीय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असणाऱ्या फ्लिपकार्टने चांगली डील उपलब्ध करून दिली आहे. या डील अंतर्गत वापरकर्ते आयफोन 13 स्वस्तात मस्त खरेदी करु शकतात. iPhone 13 सध्या Flipkart वर 61,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. मात्र Flipkart ने iPhone 13 च्या आगामी सेलमध्ये फक्त ग्राहकांसाठी काहीतरी वेगळं देण्याचा विचार केला आहे. Flipkart ने iPhone 13 ला त्याच्या उन्हाळी स्पेशल सेल 54,999 रुपयांच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध केला होता. आता Big Savings Days Sale मध्ये Flipkart आयफोनवर आणखी काही ऑफर देणार आहेत. ज्यामुळे iPhone 13 ची किंमत 50 हजारांच्या आत येऊ शकते. दरम्यान फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुम्ही 30 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत फोन खरेदी करु शकतात.  

Poco X5 Pro

Poco कंपनीने नवीन स्मार्टफोन Poco X Pro लॉन्च केला असून यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा उपलब्ध आहे. हा फोन Android 13 वर आधारित MIUI 14 वर चालतो. Poco X5 Pro हा स्मार्टफोन 20,999 रुपयांना उपलब्ध होईल.

Realme GT Neo 3T

Realme GT Neo 3T स्मार्टफोनमध्ये Snapdragon 870 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 8 GB रॅम उपलब्ध आहे. याशिवाय रॅम ५ जीबीपर्यंत वाढवण्याचा ही पर्याय आहे. फोनमध्ये 128 GB आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेज असून Realme फोनमध्ये 64-मेगापिक्सेल प्राइमरी, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यूजर्सना 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मिळते. हा फोन तुमच्या खिशाल परवडणार असून फ्लिपकार्टवर 6/128GB स्टोरेज वेरिएंटसाठी 19,999 रुपयांना उपलब्ध होईल.

Google Pixel 6a

Pixel 6a हा मिडरेंज स्मार्टफोन असून Tensor G 2 चिपसेट फोनमध्ये येतो. यामध्ये चांगल्या दर्जाचा कॅमेराही देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात f/1.7 अपर्चर आणि OIS सह 12.2MP प्राथमिक सेन्सर आणि 12MP अल्ट्रावाइड कॅमेरासह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, 18W वायर्ड चार्जिंगसह 4400 mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे, जी 24 तासांचा बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. हा Google स्मार्टफोन तुम्हाला Flipkart वर 25,999 रुपयांना उपलब्ध होईल.  

या दिवशी सेल सुरु होणार

फ्लिपकार्ट चा Big Saving Days Sale 4 मे 2023 रोजी दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. यामध्ये तुम्हाला मॉनिटर्स, वॉशिंग मशीन, एसी आणि स्मार्टफोन यांसारख्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट मिळेल.