मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम (Instagram)वर लवकरच एक बदल होणार आहे. इंस्टाग्राम अॅक्टिविटी फीडमधून फॉलोइंग टॅब हटवण्याची तयारी करत आहे. तुम्ही कोणत्या पोस्टला लाईक करत आहात. कोणत्या पोस्टवर कमेंट करत आहात आणि कोणाला फॉलो करत आहात हे यामुळे कळत होतं. पण लवकरच एका नव्या अपडेटसह हा टॅब इंस्टाग्रामवरुन हटवला जाणार आहे.
इंस्टाग्रामने एक्सप्लोर टॅबच्या आधी 2011 मध्ये हे नवीन फीचर म्हणून 'फॉलो' टॅब लॉन्च केलं होतं. आईएएनएसच्या बातमीनुसार, इंस्टाग्रामचे प्रॉडक्ट हेड विशाल शाह यांनी म्हटलं की, 'हा टॅब सिम्पलिसिटी लक्षात घेत हटवण्याचा निर्णय घेतला आहे.'
काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामने आंतरराष्ट्रीय स्तरावर रिस्ट्रिक्ट नावाचा नवा मोड सुरु केला होता. हा मोड युजरला एग्रेसिव पोस्ट किंवा अपमानास्पद कमेंट किंवा धमकी देणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी फायदेशीर ठरेल. या शिवाय Instagram ने आपल्या अॅपमध्ये डार्क मोड फीचर देखील सुरु केलं होतं.