Instagram Down: इन्स्टाग्राम झालं डाऊन,युझर्स भडकले

जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप असलेले इन्स्टाग्राम डाऊन (Instagram Down)  झाल्याची बातमी समोर आली आहे. 

Updated: May 25, 2022, 03:15 PM IST
Instagram Down: इन्स्टाग्राम झालं डाऊन,युझर्स भडकले  title=

मुंबई  : जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप असलेले इन्स्टाग्राम डाऊन (Instagram Down)  झाल्याची बातमी समोर आली आहे. देशातील अनेक युझर्सना या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे युझर्स संतापले असून सोशल मीडियावर तक्रारी देत आहेत. (instagram service down users are angry reacted on twitter) 

बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास इन्स्टाग्राम डाऊन झाल्याच्या तक्रारी वाढल्या. अनेक यूझर्सनी आधी नेट ऑन/ऑफ करुन पाहिलं. मात्र अखेर इन्स्टाग्राम डाऊन असल्याचं नेटकऱ्यांच्या लक्षात आलं. इन्स्टाग्राम डाऊन झाल्याने नेटकऱ्यांचा संताप झालाय. भारतात आतापर्यंत विविध शहरातून इन्स्टाग्राम डाऊन असल्याच्या तक्रारी येत आहेत. मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर यूजर्स याबाबत सातत्याने तक्रारी करत आहेत. 

डाउन डिटेक्टर वेबसाइटने दिलेल्या माहितीनूसार,  इंस्टाग्रामला आउटेजची समस्या भेडसावत आहे. ज्यामुळे अनेक य़ुझर्सना इंस्टाग्राम वापरण्यात तांत्रिक समस्या भेडसावत आहे.  

डाउन डिटेक्टरनुसार, ट्विटर, फेसबुकसारख्या अनेक सोशल साईट्सवर सध्या युझर्स इन्स्टाग्राम डाऊन झाल्याची तक्रार करत आहेत. यामध्ये सुमारे 44 टक्के तक्रारी अ‍ॅप्सशी संबंधित येत आहेत, तर 39 टक्के सर्व्हर कनेक्शन आणि 17 टक्के वेबसाइट डाउनशी संबंधित आहेत.

दरम्यान युझर्सच्या आलेल्या या तक्रारीवर अद्याप इन्टाग्रामने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही आहे. तसेच  युझर्सना या तक्रारी का भेडसावत आहेत, याचे कारण देखील सांगितले नाही. त्यामुळे इन्स्टाग्रामचे य़ुझर्स संतापले असून तक्रारी करत आहेत. आता इन्स्टाग्राम नेमकं कधी सुरु होणार याबाबतही माहिती मिळू शकली नाहीय.