Whatsapp वर येणार Instagram सारखे फीचर! पाहा कसं करेल काम

व्हॉट्सअ‍ॅप मागील काही दिवसांपासून नवनवीन फीचर्स (whatsapp new features today) अपडेट करत आहे. देशात व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून

Updated: Aug 23, 2022, 12:59 PM IST
Whatsapp वर येणार Instagram सारखे फीचर! पाहा कसं करेल काम   title=

whatsapp new features : Whatsapp सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग अ‍ॅप आहे.  व्हॉट्सअ‍ॅप मागील काही दिवसांपासून नवनवीन फीचर्स (whatsapp new features today) अपडेट करत आहे. देशात व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता WhatsApp वर युजर्ससाठी चॅटिंग लिस्ट मध्ये थेट स्टेटस पाहता येणार आहे. सध्या WhatsApp आणत असलेलं हे फीचर इन्स्टाग्रामवर याआधीच देण्यात आलेलं आहे.  

WhatsApp च्या लेटेस्ट अपडेटवर नजर ठेवणाऱ्या WABetaInfo च्या रिपोर्टनुसार,  व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जनमध्ये (whatsapp beta version) एक नवीन फीचर स्पॉट करण्यात आले आहे, ज्यामध्ये यूजर्स इन्स्टाग्राम स्टोरी (instagram story) सारख्या चॅटमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस देखील पाहतील. WABetaInfo ने या फीचरबद्दल माहिती शेअर केली आहे. दरम्यान जेव्हा तुमच्या संपर्कांपैकी एक नवीन स्टेटस अपडेट होईल तेव्हा तुम्हाला चॅटवरच स्टेटस  बघता येणार आहे.  

सुप्रसिद्ध सोशल मीडिया अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) एका नवीन फिचरवर काम करत आहे.  म्हणजेच त्याच्या प्रोफाइल फोटोवर एक वर्तुळ दिसेल, जे चमकत असेल. त्यावर क्लिक करून तुम्ही त्याचं Status  पाहू शकणार आहात. रिपोर्टनुसार हे फीचर काही दिवसांपूर्वी अँड्रॉईड व्हर्जनमध्ये दिसले होते. जर तुम्हाला व्हॉट्सअॅप स्टेटसशी संबंधित हे फीचर आवडत नसेल तर तुम्ही ते बंदही करू शकता. याच्या मदतीने तुम्हाला व्हॉट्सअॅपचा पूर्वीसारखाच अनुभव मिळेल. हे फीचर बीटा व्हर्जनमध्येही सर्वांसाठी रिलीझ केलेले नाही.