Data Security : सध्या समाजमाध्यमं (Social media) वापरतांना गोपनियता सुरक्षित ठेवणे (privacy maintain) करणे हे एक मोठ आव्हान आहे. तुमच्या रोजच्या वापरातील बरेच Apps तुमच्या नकळत तुमची गोपनिय माहिती (Personal data) तिऱ्हाहीत व्यक्तीला (Third Party) शेअर करतात. आपल्या रोजच्या वापरतील फेसबुक आणि इंस्टाग्रामसारखे App देखील तुमची गोपनिय माहिती तिऱ्हाहीत व्यक्तीला शेअर करणाऱ्यांपैकी एक आहेत. हे तुम्हाला माहित आहे का? वाचा हा धक्कादायक अहवाल आलाय समोर...
क्लाउड स्टोरेज कंपनी pCloud ने नुकताच Instagram बाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. वापरकर्त्यांची गोपनिय माहिती तिऱ्हाहीत व्यक्ती किंवा कंपनीला शेअर करणाऱ्या Appमध्ये Instagram अव्वल आहे. Instagram स्वत: तुमच्या फोन मधील 86% डेटा वापरतो, तर 79% डेटा तिऱ्हाहीत कंपनीला शेअर करतो.
ही गोपनिय माहिती विकुन Instagram मोठी कमाई करतो. Instagram तुमचा वयक्तिक माहिती, वापरकर्त्यांचा ब्राऊजर इतिहास ( Browser History), संपर्क यादी (contact list) आणि बरीच माहिती तुम्हाला न सांगताच तिऱ्हाहीत कंपनीला देतो.
Instagram पाठोपाठच नंबर येतो Facebook चा! Facebook तुमच्या 86% डेटा वापरतो तर त्यातील 56% डेटा तिऱ्हाहीत कंपनी/ व्यक्तीला शेअर करतो. तुमच्या व्ययक्तिक माहितीचा वापर त्यांचे उत्पादने Products विकण्यासाठी करण्यात येतो..
pCloud ने App Store च्या नव्या प्राइवसीसाठी गोळा केलेल्या माहितीमधून Social Media बद्दलचा हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अशा प्रकारे Social Media App तुमची गोपनिय माहिती विकत असल्याचे समोर आले आहे.