इंडियन नेव्हीत नोकरीची संधी, करा ऑनलाईन अर्ज

इंडियन नेव्हीत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेत.  

Updated: Dec 21, 2018, 08:12 PM IST
इंडियन नेव्हीत नोकरीची संधी, करा ऑनलाईन अर्ज title=

मुंबई : इंडियन नेव्हीत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेत. याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आलेय. उमेदवार बारावी पास असवा आणि त्याने ६० टक्के गुण मिळविले असले पाहिजेत.

AA (Artificer Apprentice), SSR (Senior secondary Recruit), MR (Matric Recruit) या पदांसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. Artificer Apprentice या पदासाठी उमेदवाराचा जन्म हा १ ऑगस्ट १९९९ ते ३१ जुलै २००२ दरम्यान असावा. तसेच एसएसआर आणि एमआर पदासाठी १ ऑगस्ट १९९८ ते २००२ दरम्यानचा जन्म असावा. उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज ३० डिसेंबरपर्यंत करावयाचा आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा.