मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत कितवा?

मोबाईल इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये भारत जगभरात १०९व्या क्रमांकावर आहे.

Updated: Mar 26, 2018, 09:34 PM IST
मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत कितवा? title=

मुंबई : मोबाईल इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये भारत जगभरात १०९व्या क्रमांकावर आहे. भारत हा जगभरातला सर्वाधिक मोबाईल डेटा वापरणारा देश आहे. उक्लाच्या स्पीडटेस्टनुसार भारतातला डाऊनलोड स्पीड मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 8.80 mbps एवढा होता. फेब्रुवारीमध्ये हाच स्पीड 9.01 mbps पर्यंत पोहोचला आहे. हा स्पीड वाढल्यानंतरही भारत १०९व्या क्रमांकावर कायम आहे. या यादीमध्ये 62.07 mbpsच्या स्पीड सह नॉर्वे या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

भारतामध्ये इंटरनेटचा सर्वाधिक वापर

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी डिसेंबरमध्ये केलेल्या दाव्यानुसार भारत १५० कोटी गीगाबाईट इंटरनेट वापरतो. कोणताही देश एवढा इंटरनेट वापरत नाही.

दारूपेक्षा इंटरनेटचा वापर जास्त

हा सर्व्हे करत असताना इंटरनेट वापरणाऱ्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये आपण टॉयलेट, खाणं, दारू यापेक्षा जास्त इंटरनेट वापरल्याचा दावा करण्यात आला. इंटरनेटसाठी ३४ टक्के लोकं दारु सोडू शकतात. तर २९ टक्के भारतीय ६ तास टॉयलेटला जाणं थांबवू शकतात. १६ टक्के भारतीय इंटरनेटसाठी अंघोळीला जाणंही सोडू शकतात. तर १४ टक्के लोक इंटरनेटसाठी संपूर्ण दिवस अन्नाचा त्यागही करु शकतात, अशी माहिती या सर्व्हेमधून समोर आली.

गर्लफ्रेंडपेक्षा इंटरनेट आवश्यक

इंटरनेटसाठी नागरिकांनी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला सोडण्याचीही तयारी दाखवली आहे. २० टक्के लोकं प्रवास करत असताना इंटरनेट जास्त गरजेचं असल्याचं मानतात. तर ११ टक्के जणं गर्लफ्रेंडला वेळ देणं तर १७ टक्के बॉयफ्रेंडसोबत प्रवास करणं पसंत करतात.