मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर ग्राहकांना धमाकेदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत. अमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलवर ५० ते ८० टक्यांपर्यंत बंपर सेल जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे शॉपिंग करणाऱ्यांना ही मोठी पर्वणी आहे.
आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर Paytm कडून ‘इंडिपेंडंस डे सेल’चे आयोजन केले आहे. Paytmचा हा सेल आठवडाभर सुरू राहणार आहे. ८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते १५ ऑगस्ट या कालावधीत हा सेल सुरू असेल.
या काळात Paytm ग्राहकांना विशिष्ट उत्पादनांच्या खरेदीवर तब्बल ८० टक्क्यांची सूट किंवा २० हजार रूपयांची कॅशबॅक मिळू शकते. मोबाईल्स, इलेक्ट्रॉनीक वस्तू तसेच कपडे आणि बूटांवर विविध शॉपिंग साईट्सवर विविध ऑफर्स देण्यात आलेत.
तर अमेझॉनच्या वेबसाईटवरून ग्राहकांनी शॉपिंग केलं तर त्यांना १० टक्के कॅशबॅक मिळेल तर अॅपच्या माध्यमातून शॉपिंग केल्यास १५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. अमेझॉनच्या या सेलमध्ये आयफोन-७ च्या ३२ जीबी मॉडेलवर १३,२०१ रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येत आहे. या डिस्काऊंटमुळे आयफोन-७ आता ४२,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येणार आहे. याचबरोबर १५,६०० रुपयांची एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे.