स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पंतप्रधान लाल किल्ल्यावर आले, त्या Range Rover कारचे फिचर्स पाहून थक्क व्हाल

Independence Day 2023 च्या निमित्तानं दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा आला आणि सर्वांच्याच नजरा तिथं वळल्या. 

सायली पाटील | Updated: Aug 15, 2023, 08:29 AM IST
स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पंतप्रधान लाल किल्ल्यावर आले, त्या Range Rover कारचे फिचर्स पाहून थक्क व्हाल  title=
Independence Day 2023 pm modi range rover car specifications Auto news

Independence Day 2023 : भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी, 15 ऑगस्ट 2023 रोजी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर हजेरी लावली. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत भारताच्या पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा कार्यक्रमस्थळी दाखल झाला आणि सर्वांच्या नजरा या शिस्तबद्ध संचलनाकडे गेल्या. पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकांनी लाल किल्ला परिसराची पाहणी केली आणि त्यानंतर एका काळ्या रंगाच्या आलिशान कारमधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्याच्या मानवंदनेचा स्वीकार करण्यासाठी पुढे सरसावले. पंतप्रधान येताच चर्चा बऱ्याच झाल्या जिथं त्यांचा पेहरावही लक्ष वेधून गेला. पण अनेकांचं लक्ष वेधलं ते म्हणजे पंतप्रधानांच्या Range Rover या खास कारनं. मोदींच्या ताफ्यात असणारी ही काळ्या रंगाची कार इतकी खास का आहे? चला जाणून घेऊया या कारचे Features. 

टाटा मोटर्सच्या Land Rover कंपनीचंच प्रोडक्ट असणारी ही रेंज रोव्हर एक सेंटिनल एसयुव्ही आहे. अतिशय विशिष्ठ पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या या एसयुव्ही कारच्या माध्यमातून त्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना उच्चस्तरिय सुरक्षा पुरवली जाते. इंजिनचं सांगावं तर, पंतप्रधानांच्या ताफ्यातील या कारला 5.0 लिटरचं V8 इंजिन देण्यात आलं आहे. जुन्या मॉडेलपेक्षा कारचं हे इंजिन तुलनेनं अधिक bhp पॉवर जनरेट करतं. या कारला उच्चस्तरिय निकषांच्या आधारे प्रमाणित करण्यात आलं असून, IED आणि तत्सम स्फोटकांचा वापर होऊनही कारला त्याचं नुकसान पोहोचणार नाही अशा पद्धतीनं ही कार तयार करण्यात आली आहे. 

हेसुद्धा पाहा : Independence Day LIVE: 'भारताची युवा शक्ती पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित'; पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधन

रेंज रोव्हर सेंटिनल एसयुव्हीला वाढीव सुरक्षितता देण्यासाठी Armored Glass देण्यात आली आहे. ज्यामध्ये काचेतून कारमध्ये असणाऱ्या व्यक्तींना सहज पाहता येऊ शकतं. कारमध्ये सायरन आणि Emergency lighting pack ही देण्यात आला आहे. शिवाय कारमध्ये टच प्रो ड्युओ इन्फोटेन्मेंट व्यवस्था देण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि काही महत्त्वाचा गरजा घेत ही कार डिझाईन करण्यात आली आहे. ज्यामध्ये 10 इंचांची हाय एन्ड हाय रेझोल्युशन टच स्क्रीन देण्यात आली आहे. यातील इन्फोटेन्मेंट सिस्टीम युजर फ्रेंडली असून, नेव्हिगेशन, मनोरंजन आणि हवामानाच्या अंदाजासह इतरही फिचर्स यामधून दिले जातात.

कोणत्याही परिस्थितीत चालू शकते ही कार....

कोणत्याही भौगोलिक परिस्थिती आणि कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर ही कार चालू शकेल अशाच पद्धतीनं ती तयार करण्यात आली आहे. हवामानातील कोणताही बदल या कारला थांबवू शकत नाही. 10.4 सेकंदांमध्ये ही कार 0 ते 100 किमी प्रति तास इतका वेग घेते. 193 किमी प्रतितास हा या कारचा सर्वाधिक वेग असल्याचा दावा केला जातो. देशाच्या पंतप्रधानांसाठी त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही कार एक योग्य पर्याय ठरते. आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षेचे निकश आणि कोणत्याही ठिकाणी काम करण्याची क्षमता पाहता पंतप्रधान मोदींकडूनही त्याफ्यातील या कारला पसंती मिळते. या कारची किंमत 10 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं सांगण्यात येतं.