मुंबई : WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग ऍप आहे. यावरुन तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना मेसेज, फोटो किंवा व्हिडीओ पाठवू शकतात. एवढंच काय तर तुम्ही त्यांना व्हिडीओ कॉल करुन देखील त्यांची माहिती घेऊ शकता. म्हणजेच एखाद्याशी कनेक्ट राहण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अनेक पर्याय मिळतात. परंतु सुरुवातीला या प्लॅटफॉर्मवर अशी कोणतीही सुविधा नव्हती. सुरुवातीच्या काळात इथे फक्त टेक्स्ट मेसेज पाठवण्याची सोय होती. नंतर, वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी, कंपनीने त्यात ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंगसह अनेक नवीन फीचर्स जोडले.
Meta च्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर, वापरकर्त्यांना असे अनेक छुपे फीचर्स मिळतात, ज्याची आपल्या माहिती नसते, परंतु याचा वापर करून आपल्याला बऱ्याच गोष्टी सोप्या करता येतात. तसेच बरीचशी बचत देखील होते.
रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सऍप कॉलमध्ये प्रत्येक मिनिटाला 720Kb डेटा खर्च होतो. हा डेटा फारसा दिसत नसला तरी त्याचा तुमच्या मोबाइल डेटावर नक्कीच परिणाम होतो. ज्यामुळे बऱ्याच लोकांना प्रॉबलम येतो. अशात हे लोकं हा डेटाचा वापर कमी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात. अशा लोकांना आम्ही एक ट्रीक सांगणार आहोत. जो त्यांना डेटा वाचवण्यात मदत करेल.
खरेतर व्हॉट्सऍपवर 'कॉलसाठी कमी डेटा वापर' हा पर्याय उपलब्ध आहे. या फीचरचा वापर करून तुम्ही तुमचा डेटा वापर कमी करू शकता. या वैशिष्ट्याचे तपशील आणि तुम्ही ते कसे वापरू शकता ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
जर तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोन यूजर असाल तर तुम्हाला तुमच्या फोनवर व्हॉट्सऍप ओपन करावे लागेल.
येथे तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्यात 'तीन ठिपके' दिसतील.
आता तुम्हाला मेनूमधील सेटिंगवर क्लिक करावे लागेल.
येथे तुम्हाला स्टोरेज आणि डेटा पर्यायावर जावे लागेल.
तुम्हाला कॉल्ससाठी कमी डेटा वापरा या पर्यायावर जावे लागेल आणि समोर दिसणारे टॉगल चालू करावे लागेल.
तुम्ही iPhone युजर असाल तर, तुम्हाला जवळपास समान पर्याय मिळेल, जो तुम्ही चालू करू शकता आणि WhatsApp कॉलमध्ये खर्च केलेला डेटा कमी करू शकता. लक्षात घ्या की व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल ऑडिओ कॉलपेक्षा जास्त डेटा वापरतो, परंतु सध्या असा कोणताही पर्याय उपलब्ध नाही, ज्याच्या मदतीने तुम्ही व्हिडीओ कॉल दरम्यान डेटाचा वापर कमी करू शकता.