Tips And Tricks: इन्स्टाग्रामवर Reels करत असाल तर ही 3D अवतार ट्रिक वापरा, कसं ते जाणून घ्या

मेटाने नुकतीच अवतार स्टोअर सुरू करण्याची घोषणा केली आहे. युजर्संना त्यांच्या अवताराची स्टाइल देण्यासाठी डिजिटल आउटफिट खरेदी करण्यास सुविधा देते. कंपनीने निवडक देशांमध्ये ऑनलाइन स्टोअर सुरू केले आहे. स्टोअरमध्ये बॅलेन्सियागा, प्राडा आणि थॉम ब्राउन या ब्रँडच्या डिजिटल पोशाखांचा समावेश आहे.

Updated: Dec 4, 2022, 02:31 PM IST
Tips And Tricks: इन्स्टाग्रामवर Reels करत असाल तर ही 3D अवतार ट्रिक वापरा, कसं ते जाणून घ्या title=

How to share 3d avatar on Instagram Reels: इन्स्टाग्रामवर रिल्स तयार करणाऱ्यांचा क्रेझ गेल्या काही दिवसात वाढला आहे. जर तुम्हालाही रिल्स तयार करण्याची आवड असेल तर 3D अवतार वापरु शकता. इतकंच काय तर क्रिएटर्स आपल्या फॉलोअर्संना पर्सनलाइजही करू शकतात. यापूर्वी हे फीचर फक्त स्टोरी आणि चॅटमध्ये उपलब्ध होतं. आता युजर्स रिल्स बनवताना एनेबल करू शकतात. एकदा का 3D अवतार तयार झाला की रिल्स, चॅट्स आणि स्टोरीजमध्ये अपडेट करू शकता. मेटाने नुकतीच अवतार स्टोअर सुरू करण्याची घोषणा केली आहे. युजर्संना त्यांच्या अवताराची स्टाइल देण्यासाठी डिजिटल आउटफिट खरेदी करण्यास सुविधा देते. कंपनीने निवडक देशांमध्ये ऑनलाइन स्टोअर सुरू केले आहे. स्टोअरमध्ये बॅलेन्सियागा, प्राडा आणि थॉम ब्राउन या ब्रँडच्या डिजिटल पोशाखांचा समावेश आहे.जर तुम्हाला 3D वापरायचा असेल तर सोप्या स्टेप्स फॉलो करा. चला जाणून घेऊयात 3D अवताराबाबत..

  • सर्वात आधी इन्स्टा अ‍ॅप वर जा. त्यानतर लेफ्ट साइडला स्वाइप करा आणि रील्स टॅबवर क्लिक करा.
  • आता आपलं रील रेकॉर्ड करा. एडिटिंग करताना स्टीकर्स बटणवर क्लिक करा.
  • आता तुम्हाला Avatar ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. तिथे तुमच्या आवडीच्या रिअ‍ॅक्शनवर क्लिक करू शकता.
  • रील्स एडिट केल्यानंतर नेक्स्ट बटणवर क्लिक करा
  • आता कॅप्शन इंटर करा आणि लोकांना टॅग करा. आता तुम्ही शेअर करू शकता. 

बातमी वाचा- AMT ते DCT पर्यंत चार पद्धतीचे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, जाणून घ्या कोणता पर्याय बेस्ट

किशोरांच्या गोपनीयतेसाठी नवीन वैशिष्ट्य येत आहे

मेटा युजर्सची मागणी पाहता नवीन फीचर्सवर काम करत असते. लवकरच कंपनी किशोरवयीन मुलांचे गोपनीयता धोरण लक्षात घेऊन एक नवीन फीचर आणणार आहे. नवीन फीचरमध्ये, किशोरवयीन त्यांचे प्रोफाइल त्यांच्या मित्रांच्या यादीपर्यंत मर्यादित करू शकतात. त्यांचे पेज आणि पोस्ट कोण पाहू आणि लाईक करू शकतो हे किशोरवयीन ठरवू शकतील. यासोबतच किशोरांना इन्स्टाग्रामवरील अश्लील फोटो आणि व्हिडिओंपासूनही संरक्षण मिळेल.