मुंबई : आपल्यापैकी जवळपास सर्वचजण व्हॉट्सअॅपचा वापर करतात. पण व्हॉट्सअॅपचा फायदा कसा करुन घेऊ शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अनेकदा आपलं मित्र किंवा मैत्रिणीसोबत भांडण होतं आणि त्यानंतर व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं जातं. तुम्हालाही असचं कुणीतरी ब्लॉक केलं आहे? तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे पण संधी मिळत नाहीये? तर काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत.
चला तर मग, जाणून घेऊयात एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर त्याच्यासोबत तुम्ही कसा संवाद साधू शकता.
ही ट्रिक करण्यासाठी तुम्हाला एका मित्राची किंवा मैत्रिणीची मदत घ्यावी लागेल. म्हणजेच ज्याने तुम्हाला ब्लॉक केलं आहे त्याच्यात आणि तुमच्या एका कॉमन फ्रेंडची मदत घ्यावी लागेल. ही ट्रिक यशस्वी करण्यासाठी तुमचा तिसरा मित्रच महत्वाची भूमिका पार पाडणार आहे.
सर्वातआधी तुमचा तिसरा मित्र एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवेल. त्या ग्रुपमध्ये तो तुम्हाला अॅड करेल आणि ज्या मित्र किंवा मैत्रिणीने तुम्हाला ब्लॉक केलं आहे त्यालाही अॅड करेल.
तुम्ही दोघेही मित्र ग्रुपमध्ये अॅड झाल्यानंतर तुमचा तिसरा मित्र ग्रुप सोडेल. म्हणजेच तो ग्रुप लेफ्ट करेल. त्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तुम्ही आणि तुमचा मित्र (ज्याने तुम्हाला ब्लॉक केलं होतं तो) असे दोघेच राहाल.
तुम्ही दोघेच ग्रुपमध्ये असल्याने तुम्ही तुमची बाजू मांडू शकता. तसेच दोघांमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याची ही एक संधी तुम्हाला मिळेल.