गूगलने सांगितलं, अशाप्रकारे जास्तवेळ वापरा मोबाईलची बॅटरी

निम्म्याहून अधिक कामात स्मार्टफोनचा वापर केला जातो.

Updated: Apr 25, 2019, 02:02 PM IST
गूगलने सांगितलं, अशाप्रकारे जास्तवेळ वापरा मोबाईलची बॅटरी  title=

मुंबई : स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग झाला आहे. एखाद्या वेळी ऑफिसला जाताना संबधित व्यक्ती त्याचा जेवणाचा डबा घरी विसरेल, मात्र स्मार्टफोन सोबत न्यायला विसरणार नाही. निम्म्याहून अधिक कामात स्मार्टफोनचा वापर केला जातो. परंतु स्मार्टफोनमधील चार्जिंग लवकर संपल्यामळे मोबाईल वापरणारे वैतागून जात आहे. कशाप्रकारे फोनची बॅटरी दीर्घकाळ वापरता येईल? असा प्रश्न अनेकांना पडले असतील. 

स्मार्टफोनमधील बॅटरीचा खप लवकर होत असल्याने अनेकजण गोंधळून जातात. यासाठीच गूगलने स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. स्मार्टफोनमधील बॅटरी कशी दीर्घकाळ चालवता यईल? याची गुगले योग्य माहिती घेतली आहे. यामुळे स्मार्टफोन वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

गूगलने मागील वर्षी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम ऍन्ड्राईडमध्ये डार्क मोड फीचर सादर केला होता. गुगलच्या माहितीनुसार, आपल्या स्मार्टफोनमधील व्हाईट बॅकग्राऊंडमुळे स्मार्टफोनच्या बॅटरीवर नकारत्मक प्रभाव पडतो. यामुळे फोनची बॅटरी लवकर संपते. 

मोबाईल वापरणारे व्हाईट बॅकग्राऊंडचा वापर न करता, डार्क मोड थीमचा वापर केल्यास चांगला परिणाम मिळू शकतो. तज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, व्हाईट बॅकग्राउंडमुळे शाररीक त्रासही निर्माण होतो, असे सांगितले जात आहे. 

व्हाईट बॅकग्राऊंडमुळे डोळ्यांना अधिक त्रास होतो. जर युजर्सने डार्क मोड वापर केल्यास युजर्सला डोळ्याचा चिंतेपासून दूर राहता येईल. फेसबुक मॅसेंजरमध्येही डार्क मोडचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे मोबाईलची बॅटरी तर वाचवता येईल, त्याचबरोबर युजर्सच्या डोळ्यांनादेखील त्रास होणार नाही.