मुंबई : बऱ्यादा असं होतं की, आपण फोटो Google ड्राइव्ह किंवा Google Photos मध्ये सेव्ह करुन ठेवतो. परंतु मेमरी फुल झाली की, आपल्याला नाइलाजाने डीलिट करावे लागतात. परंतु जर असे डीलिट केलेले फोटो तुम्हाला पुन्हा पाहिजे असतील तर? किंवा अशी एखादी फाईल तुम्हाला पाहिजे असेल तर?
जर तुम्ही डीलिट केलेल्या गोष्टी 30 दिवसांच्या आता पाहिजे असेल तर ते तुम्हाला सहज मिळवू शकता परंतु, जर तुम्हाला त्याच्या नंतर फाईल्स किंवा फोटे हवे असतील तर? अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी काही अतिशय सोप्या टिप्स आणि युक्त्या घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही हे फोटो किंवा फाईल्स परत मिळवू शकता.
गुगल फोटो तुम्हाला 60 दिवसांचा विंडो वेळ देते जे फोटो किंवा मेमरी साठवण्यासाठी सर्वोत्तम आहे. परंतु त्या काळात तुम्हाला पुनर्प्राप्तीचा पर्याय दिसत नाही. या प्रकरणात आपल्याला काही चरणांचे पालन करावे लागेल.
1. तुमच्या अँड्रॉइड टॅब्लेटवर, प्रथम Google फोटो अॅपवर क्लिक करा.
2. यानंतर, स्क्रीनच्या मध्यभागी जाऊन लायब्ररी टॅबवर क्लिक करा.
3. यानंतर तुम्हाला वरतीच ट्रॅश फोल्डर दिसेल. आपले सर्व हटवलेले फोटो येथे आढळू शकतात.
4. यानंतर, जर तुम्हाला ते फोटो किंवा फाईल पुन्हा मिळवायचा असेल, तर तुम्हाला फोटो आणि व्हिडीओ होल्ड करुन ठेवावे लागणार आणि त्यानंतर रिस्टोर वर क्लिक करा.
जर तुमचा हटवलेला फोटो ट्रॅशमध्ये दिसत नाही, तर याचा अर्थ असा की, फोटो हटवल्यापासून 60 दिवसांपेक्षा जास्त काळ झाला आहे आणि आता तो ट्रॅश बाहेर गेला आहे. असेही होऊ शकते की, आपण ट्रॅशमधून फोटो कायमचा हटवला आहे.