पॅनकार्ड खराब झालंय किंवा चोरी झालंय; आता घरबसल्या करा अप्लाय, ऑनलाइन प्रोसेस जाणून घ्या

Pan Card Duplicate Copy: पॅनकार्ड हे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. याचा उपयोग अनेक कामांसाठी केला जातो. जर तुमचेही पॅनकार्ड हरवले असेल तर असं करा मिळवाल. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 9, 2024, 03:00 PM IST
पॅनकार्ड खराब झालंय किंवा चोरी झालंय; आता घरबसल्या करा अप्लाय, ऑनलाइन प्रोसेस जाणून घ्या title=
how to get duplicate pan card if you damaged your original know the process

Pan Card Duplicate Copy: पॅन कार्ड एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. अर्थविषयक माहिती देत असताना पॅन कार्डचा नंबर दिला जातो. आयकर विभागाकडून पॅनकार्ड जारी केले जाते. या पॅनकार्डवर एक 10 अंकी क्रमांक असतो हा परमनेंट अकाउंट नंबर असतो. पॅनकार्डचा वापर खूप महत्त्वपूर्ण कारणांसाठी केला जातो. इनकम टॅक्स रिटर्न फाइल करणे, बँक खाते सुरु करण्यासाठी, कर्ज घेण्यासाठी, शेअर खरेदी करण्यासाठी, दागिने खरेदी करण्यासाठी, विदेश यात्रा यासाठी पॅनकार्डचा वापर केला जातो. पण जर तुमचे पॅन कार्ड खराब झाले असले तर त्यावरील क्रमांकही अस्पष्ट दिसू लागतो. अशावेळी खूप अडचणी येतात. ड्युप्लिकेट पॅन कार्ड कसं बनवाल? याची प्रक्रिया जाणून घेईया. 

पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. ज्याचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो. जर तुमचे पॅनकार्ड हरवले असेल किंवा चोरी झाले असेल किंवा काही कारणास्तव खराब झाले तर तुम्ही डुप्लीकेट पॅनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करु शकता. त्यासाठी लागणारे कागदपत्र आणि प्रक्रिया सविस्तर जाणून घेऊया. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा. 

1 आयकर विभाग पॅन सर्व्हिसच्या वेबसाइटवर जा https://www.tin-nsdl.com/ 

2 होम पेजवर 'Reprint of PAN Card' लिंकवर क्लिक करा

3 या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. जिथे तुम्हाला तुमच्या पॅन कार्डची माहिती भरावी लागणार आहे. 

4 तुमच्या पॅनकार्डसोबतच तुमचा रजिस्टर मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल

5 ओटीपी आल्यानंतर त्यावर सबमिट बटणावर क्लिक करा

6 आता तुम्हाला पेमेंट करण्यासाठी एक पर्याय येईल

7 तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिग, डिमांड ड्राफ्ट किंवा चेकच्या माध्यमातून पेमेंट करु शकता. 

8 पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक Acknowledgment Slip मिळेल. 

9 अर्ज केल्यानंतर तुमचे डुप्लिकेट पॅनकार्ड बनवण्यासाठी किती वेळ लागेल याची माहिती त्या Acknowledgment Slip वर येईल. 

डुप्लीकेट पॅनकार्ड मिळवण्यासाठी किती वेळ लागेल

डुप्लीकेट पॅनकार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला जवळपास 15 ते 20 दिवस लागतील. ड्युप्लीकेट पॅनकार्ड तुमच्या रजीस्टर केलेल्या पत्त्यावरच येणार आहे. डुप्लिकेट पॅन कार्डमध्ये तुमच्या पॅन कार्डची सर्व माहिती तशीच राहील.
डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करताना, तुम्हाला 105 रुपये शुल्क भरावे लागेल