7 सीटर फॅमिली कार घ्यायचीये? 'या' कारची होतेय सर्वाधिक विक्री, किंमत 10 लाखाहून कमी

Best Selling 7-Seater Car: तुम्हालाही कार घेण्याची इच्छा आहे. पण बजेच आडवं येतंय. आज आम्ही तुम्हाला बेस्ट 7 सीटर कारबाबत सांगणार आहोत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 9, 2024, 02:05 PM IST
7 सीटर फॅमिली कार घ्यायचीये? 'या' कारची होतेय सर्वाधिक विक्री, किंमत 10 लाखाहून कमी title=
Best Selling 7 seater car in India know the price and features

Best Selling 7-Seater Car Maruti Ertiga: कार घेताना सर्वात आधी विचार केला जातो तो म्हणजेच संपूर्ण कुटुंबांसाठी सीटिंग कॅपेसिटी योग्य आहे का. पण जर तुमचे बजेट कमी आहे आणि तुम्हाला 7 सीटर कार खरेदी करायची आहे. तर बाजारात अनेक ऑप्शन आहेत. बाजारात अनेक सात सीटरच्या कार उपलब्ध आहेत. पण आज आम्ही तुम्हाला फिचर्स आणि किंमतबाबत बेस्ट असलेल्या कारबाबत सांगणार आहोत. बाजारात 7 सीटर कारमध्ये अनेक पर्याय आहेत. यातीलच एक म्हणजे मारुती सुझुकी आर्टिगा आहे. ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी एमपीव्ही आहे. आर्टिगा 7 सीटर लेआउटमध्ये येते आणि एमपीव्ही सेमगेंटमध्ये आहे. 

मारुती आर्टिगा डिसेंबर 2023मध्ये सर्वात जास्त विकणारी एमपीव्ही ठरली आहे. या कारचे एकूण 12,975 युनिट्सची विक्री झाली आहे. डिसेंबर 2022मध्ये विक्री झालेले 12,273 युनिट्सच्या तुलनेते 6 टक्के अधिक आहेत. त्याचबरोबर, डिसेंबर 2023 मध्ये ही चौथी सर्वाधिक विक्री होणारी कार होती. विक्रीच्या बाबतीत, या कारच्या आधी Tata Nexon, Maruti Dzire आणि Tata Punch वर आहेत, या कार कंपनीने अनुक्रमे 15,284, 14,012 आणि 13,787 युनिट्स विकल्या आहेत.

मारुती आर्टिगा एकूण 4 व्हेरियंटमध्ये येते. यातील एलएक्सआई, वीएक्सआई, जेडएक्सआई आणि जेडएक्सआई प्लसमध्ये उपलब्ध आहेत. यातील वीएक्सआय आणि जेडएक्सआय व्हेरियंटमध्ये सीएनजीचा पर्याय देण्यात आला आहे. किंमतीबाबत बोलायचे झाल्यास आर्टिगाची किंमत 8.46 लाख रुपयांपासून ते 13.08 लाख रुपयांपर्यंत आहे. 

कलर ऑप्शन आणि बूट स्पेस

ही कार ऑर्बन रेड, मॅग्मा ग्रे, पर्ल मेटेलिक, आर्कटिक व्हाइट, पर्ल मेटेलिक डिग्निटी ब्राउन, प्राइम ऑक्सफॉर्ड ब्लू आणि स्प्लेंडिड सिल्व्हर या रंगात उपलब्ध आहे. या कारचा बूट स्पेस 209 लीटर इतका आहे. जर तुम्ही थर्ड रोची सीट फोल्ड केली तर ती जागा 550 लीटरपर्यंत वाढते. त्यामुळं तुम्ही सामानही ठेवू शकता. 

इंजिन स्पेसिफिकेशन

Ertiga मध्ये सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानासह 1.5-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आहे. हा सेटअप 103 PS/136.8 Nm जनरेट करतो. 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायासह आलेल्या या कारचे मायलेजही चांगले आहे. ही कार पेट्रोलवर 20.51 किलोमीटरपर्यंत मायलेज देऊ शकते. त्याच वेळी, त्याचे CNG प्रकार 26.11 किमीपर्यंत मायलेज देते परंतु ते केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. CNG किटसह इंजिन 88 PS आणि 121.5 Nm जनरेट करते.

फिचर्स

कारच्या फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास अँड्रोइड ऑटो, अॅप्पल कारप्ले, 7 इंच स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, पॅडल शिफ्टर्स, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी (टेलीमेटिक्स) क्रुज कंट्रोल, ऑटो हेडलँप्स, ऑटो एसी,4 एअरबॅग, एबीसीसोबतच ईबीडी आणि ब्रेक असिस्टसारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.