तुमची Google History दुसरे कोणी पाहण्याची भीती वाटतेय ? मग 'ही' गोष्ट करा

प्रत्येकाला आपली गुगल हिस्टरी गोपनिय रहावी असचं वाटतं, मात्र कोणीही मोबाईल हातात घेतल्यावर गुगल सर्चची माहिती त्यांना कळण्याची प्रत्येकाला भीती सतावत असते.

Updated: May 23, 2022, 07:47 PM IST
तुमची Google History दुसरे कोणी पाहण्याची भीती वाटतेय ?  मग 'ही' गोष्ट करा  title=

मुंबई : प्रत्येकाला आपली गुगल हिस्टरी गोपनिय रहावी असचं वाटतं, मात्र कोणीही मोबाईल हातात घेतल्यावर गुगल सर्चची माहिती त्यांना कळण्याची प्रत्येकाला भीती सतावत असते. त्यामुळे तुम्हाला जर नेहमी टेन्शन येत असेल तर या सोप्या टिप्स फॉलो करा, तुमची गुगल हिस्टरी कोणालाच कळणार नाही.  

'या' स्टेप्स फॉलो करा 

सर्वप्रथम तुमच्या Google Chrome ब्राउझरवर जा.

गुगल क्रोम ब्राउझरवर तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला तीन डॉट्स दिसतील. या तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अनेक पर्याय उघडतील.

तुम्हाला हिस्ट्री ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.

क्लिकनंतर तुम्हाला वरच्या बाजूला Clear Browsing Data पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. 

तुम्हाला दोन पर्याय दिसतील, एक Basic आणि दुसरा Advance. तुम्ही तुमच्यानुसार यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकता.

डेटा क्लियर करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला अनेक पर्याय दिले जातात. यामध्ये किती दिवसांपूर्वीचा डेटा क्लिअर करायचा आहे, याचा पर्याय देते.येथे आपल्याला  24 तासापूर्वीच, 7 दिवसांपूर्वीचं आणि मागच्या 4 आठवड्यांचा डेटावर क्लिअर करता येणार आहे.