तुमची मुलं Smartphone वर Adult कंटेंट पाहतायत, YouTube वरून असे हटवता येणार

युट्यूबवरील अडल्ट कटेंटपासून लहान मुलांना दुर ठेवायचंय, या टीप्स वापरा 

Updated: Aug 23, 2022, 07:52 PM IST
 तुमची मुलं Smartphone वर Adult कंटेंट पाहतायत, YouTube वरून असे हटवता येणार  title=

मुंबई : आजकाल लहानातली लहान मुलं देखील स्मार्टफोन हाताळतात. मग त्यांना स्मार्टफोन चालवता येत नसला तरी ते हाताळताना तुमच्या आमच्या घरात पाहायला मिळतील. य़ुट्यूबवर या गोष्टी पाहत असताना नकळत ही मुलं अडल्ट कटेंट पाहण्याच्या आहारी जातात. तुमची लहान मुलं मोबाईलमध्ये शांतपणे डोकावून बसलेली पाहून तुम्ही सुटकेचा श्वास घेत असाल. मात्र तसं करण तुम्हाला महागात पडू शकते. कारण नकळत युट्यूबवर लहान मुलं अडल्ट कटेंट पाहू शकता. त्यांना या कटेंटपासून दुर ठेवण्यासाठी काय केलं पाहीजे ते जाणून घेऊयात. 

YouTube सर्व वयोगटातील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. लहान मुले असो वा प्रौढ, प्रत्येकाला YouTube वर व्हिडिओ पाहणे आवडते. YouTube सर्व प्रकारच्या व्हिडिओंनी भरलेले आहे, अशा स्थितीत मुले जेव्हा यूट्यूबवर असतात तेव्हा पालकांना नेहमीच भीती असते की चुकून कोणताही आक्षेपार्ह व्हिडिओ उघडला जाऊ नये.जर हा प्रश्न सतावत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. जाणून घेऊयात YouTube वरील अडल्ट कटेंट कसा काढून टाकालं. 

लॅपटॉपसाठी Restricted Mode ?

  • वेब ब्राउझरवर YouTube.com उघडा.
  • वरच्या उजव्या कोपऱ्यात तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा.
  • प्रोफाइल मेनूमधून, "Restricted Mode" वर क्लिक करा.
  • "Restricted Mode" पर्यायासाठी टॉगल चालू करा.

मोबाईलसाठी Restricted Mode ?

  • तुमच्या स्मार्टफोनवर YouTube अॅप उघडा.
  • YouTube सेटिंग्जमध्ये सामान्य मेनूवर जा.
  • Restricted Mode पर्यायावर जा.
  • "Restricted Mode सक्रिय करा" साठी टॉगल चालू करा

दरम्यान वरील सर्व पर्याय वापरून तुम्ही लॅपटॉप आणि मोबाईलच्या Youtube मधील "Restricted Mode" सक्रिय होईल. आणि अडल्ट कटेंट दिसणार नाहीत. त्यामुळे तुमची मुलं देखील अडल्ट कटेंट पासून दुर राहतील.