बाइकच्या टायरमध्ये किती हवा असणं आवश्यक आहे? जाणून घ्या अन्यथा बसेल फटका

दुचाकी चालवताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. टायरमध्ये हवेचं प्रेशर योग्य आहे की नाही पाहणं गरजेचं आहे. 

Updated: Aug 23, 2022, 01:55 PM IST
बाइकच्या टायरमध्ये किती हवा असणं आवश्यक आहे? जाणून घ्या अन्यथा बसेल फटका title=

Correct Tyre Pressure For Bike: देशात चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी वाहनांना सर्वाधिक पसंती मिळते. कारण चारचाकी पेक्षा दुचाकी स्वस्त असून सामान्य नागरिकांना परवडणारी आहे. तसेच वाहतूक कोंडीतून रस्ता काढणं देखील दुचाकीस्वारांना सोपं असतं. पण दुचाकी चालवताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. टायरमध्ये हवेचं प्रेशर योग्य आहे की नाही पाहणं गरजेचं आहे. टायरमध्ये हवेचा दाब कमी किंवा जास्त असणं, नुकसानदायक ठरू शकतो. रस्त्यावरून बाइक चालवताना अपघात होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर हवेचा दाब कमी अधिक असेल तर मायलेजवर परिणाम होऊ शकतो. 

बाइकचा टायरमध्ये हवेचा दाब काही स्थितींवर अवलंबून आहे. आपण आपली बाइक कुठे चालवता आणि किती वजन घेऊन जात आहात, यावर अवलंबून आहे. याशिवाय हवेचा दाब बाइकच्या टायरच्या आकारावर अवलंबून असतो. तुमच्या बाइकमधील टायर आणि ट्यूबचा दर्जा चांगला नसेल तर हवेच्या जास्त दाबामुळे ट्यूब फुटण्याची भीती असते. 

बाइकच्या टायरमध्ये हवेचा दाब इतका असावा

साधारणपणे, बाईकच्या पुढील टायरमधील हवेच्या दाबाची श्रेणी 22 PSI ते 29 PSI असू शकते. तर, मागील टायरमध्ये हवेचा दाब 30 PSI ते 35 PSI पर्यंत असू शकतो. जास्त हवा मागे ठेवली जाते कारण त्यावर जास्त भार असतो. तथापि, वेगवेगळ्या परिस्थितीनुसार, हवेचा दाब 2 ते 4 बिंदूंनी वर आणि खाली असू शकतो.  तुम्ही अजूनही तुमच्या बाइकमधील हवेच्या दाबेबाबत संभ्रमात असाल तर बाइकसोबत येणाऱ्या मॅन्युअल बुकमध्ये तपासून बघा.

Tags: