३ डी स्कॅनरसह Honor Magic 2 3D लॉन्च

स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच OLED फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

Updated: Mar 9, 2019, 05:03 PM IST
३ डी स्कॅनरसह Honor Magic 2 3D लॉन्च title=

नवी दिल्ली : 'ऑनर' कंपनीने Honor Magic 2 3D हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीकडून या फोनला चीनमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. चांगल्या फिचर्ससाठी 'ऑनर' स्मार्टफोनला बाजारात मागणी आहे. 'ऑनर' भारतीय बाजारात स्मार्टफोन कधी लॉन्च केला जाईल याबाबत कंपनीकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. सुरक्षेचा विचार करत फोनला ३ डी स्कॅनर देण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन चीनमध्ये जवळपास ६० हजार रूपयांना बाजारात आणला आहे. Honor Magic 2 3D या स्मार्टफोनमध्ये कंपनीने सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. 

काय आहेत Honor Magic 2 3D ची वैशिष्ट्ये -

- ६.४ इंच ओएलएड एचडी डिस्प्ले
- २३४०*१०८० रिजॉल्यूशन
- ऑक्टो-कोअर किरिन ९८० SoC प्रोसेसर
- ८ जीबी रॅम
- ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज
- अॅन्ड्राइड ९ pie
- ३४०० mAh बॅटरी
- ४०W फास्ट चार्जिंग 
- लॉक आणि अनलॉकसाठी फिंगरप्रिंटसह ३D फेस अनलॉक
- ट्रिपल कॅमेरा सेटअप

Honor Magic 2 3D स्मार्टफोनमध्ये कॅमेरावर खास लक्ष देण्यात आले आहे. फोनला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. १६ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला असून लो लाइट फोटोग्राफीसाठी १.८ अपर्चर देण्यात आला आहे. दुसरा कॅमेरा २४ मेगापिक्सल असून ब्लॅक अॅन्ड व्हाइट मोनोक्रोम सेंसरची सुविधा देण्यात आला आहे. अल्ट्रा वाइड अॅंगलसाठी २ मेगापिक्सल तिसरा कॅमेरा आहे. १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. काळा, निळा आणि लाल रंगात Honor Magic 2 3D उपलब्ध आहे.