लॉन्च होण्यापूर्वी लीक झाला ऑनर 10 चा लूक, फिचर्सही झाले व्हायरल

Huawei कंपनीचा सब ब्रँड असलेल्या ऑनर 10 या स्मार्टफोनचा लूक लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाला आहे. हा स्मार्टफोन लंडनमध्ये १५ मे रोजी लॉन्च होणार आहे. म्हणजेच हा फोन लॉन्च होण्यासाठी अद्याप एका महिन्याचा कालावधी आहे. हा फोन लॉन्च होण्यापूर्वी फोनची डिझाईन आणि फीचर समोर आले आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Apr 8, 2018, 05:41 PM IST
लॉन्च होण्यापूर्वी लीक झाला ऑनर 10 चा लूक, फिचर्सही झाले व्हायरल title=
Image: Social Media

मुंबई : Huawei कंपनीचा सब ब्रँड असलेल्या ऑनर 10 या स्मार्टफोनचा लूक लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाला आहे. हा स्मार्टफोन लंडनमध्ये १५ मे रोजी लॉन्च होणार आहे. म्हणजेच हा फोन लॉन्च होण्यासाठी अद्याप एका महिन्याचा कालावधी आहे. हा फोन लॉन्च होण्यापूर्वी फोनची डिझाईन आणि फीचर समोर आले आहेत.

हे आहेत फिचर्स...

रिपोर्ट्सनुसार, ऑनर 10 या फोनचा डिस्प्ले 5.8 इंचाचा आहे आणि यामध्ये 970 ऑक्टाकोअर प्रोसेसर, 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. याच्या मागील बाजूला ग्लास प्लेट देण्यात आली आहे. या फोनचा लूक ऑनर 8 आणि ऑनर 9 सारखा आहे. या फोनचा ब्रँड अॅम्बेसिडर चीनमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता Hu Ge आहे.

मागच्या बाजुला फिंगर प्रिंट सेंसर नाही

बॅनर पाहून स्पष्ट होत आहे की, फोनच्या मागच्या बाजुला फिंगर प्रिंट सेंसर नाहीये. त्यामुळे फिंगर प्रिंट सेंसर हे पुढील बाजुला असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा बॅनर चीनमधील एका स्टोअरमधून लीक झाला आहे.

फ्लॅगशिप स्मार्टफोन

असं मानलं जात आहे की, हा फोन ऑनर कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन असणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने ऑनर व्यू 10 लॉन्च केला होता ज्याचा डिस्प्ले 5.99 इंचाचा आहे. यामध्ये मेटल डिझाइन देण्यात आली आहे. या फोनची सुरुवाती किंमत 29,999 रुपये आहे.