नवी दिल्ली : होंडा मोटारसायकल एंड स्कूटर इंडीयाने हॉर्नेट २.० ही नवी बाईक बाजारात आणलीय. कंपनीने १८०-२०० सीसी इंजीन क्षमता वाल्या मोटारसायकलने दमदार एन्ट्री केलीय. याची शोरुम किंमत १.२६ लाख इतकी आहे.
हॉर्नेट २.० मध्ये १८४ सीसीचा बीएस-६ पॉवर ट्रेन इंजिन आहे. यामध्ये इंजिन बंद आणि सुरु करण्याची यंत्रणेसह अन्य नवे फिचर्स आहेत. आपल्या पोर्टफोलिओ विस्तारण्याच्या युगाची होंडा सुरुवात करत असल्याचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आत्सुशी ओगाता यांनी सांगितले. यामुळे भारतातील वाढती मागणी पूर्ण होणार आहे. भारतासह अन्य देशांमध्ये देखील याची निर्यात होणार आहे. येणाऱ्या काळात कंपनी प्रिमियम दर्जाची आणखी मॉडेल्स बाजारात आणणार आहे.
याआधी कंपनीने भारतात १६० सीसीची हॉर्नेट आणि १६० आरची विक्री केलीय. सुरु वर्षात १ एप्रिलपासून केवळ बीएस-६ वाहनांच्या विक्रीला परवानगीमुळे कंपनीने ही बाजारातून मागे घेतली.
हॉर्नेट २.० मध्ये USD फोर्क दिले गेलंय. या सेगमेंटच्या बाईकमध्ये हे पहिल्यांदाच दिसणार आहे. मोटारसायकलमध्ये रिव्हर्स एलसीडी इंस्ट्रूमेंट क्लस्टर आहे. ज्यामध्ये गियर पोझिशन इंडिकेटर, सर्व्हिस ड्यू इंडिकेटर आणि बॅटरी वोल्टमीटरची सुविधा आहे. याशिवाय होंडाच्या नव्या बाईकमध्ये एलईडी इंडीकेटर्स, हॅजर्ड लॅम्प आणि सील्ड चेन देखील आहे.